ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाड इमारत दुर्घटना : शक्य ती सर्व मदत करणार - पंतप्रधान मोदी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2020 03:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाड इमारत दुर्घटना : शक्य ती सर्व मदत करणार - पंतप्रधान मोदी

शहर : देश

रायगड जिल्ह्यातील (Raigad)महाड शहरात (Mahad)झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी दु: व्यक्त केलं आहे. तसंच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे. पीएमओकडून (PMO)ट्विट करुन दुर्घटनेत जखमी झालेल्यांसाठी प्रार्थना केली आहे.

महाडमध्ये झालेल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी अतिशय दु: आहे. स्थानिक अधिकारी आणि एनडीआरएफच्या पथकाकडून या दुर्घटनेठिकाणी बचावकार्य सुरु आहे. यासाठी सर्व शक्य ती मदत केली जाणार असल्याचं मोदींनी म्हटलं आहे.

राजगड जिल्ह्यातील महाडमध्ये सोमवारी 5 मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. या दुर्घटनेप्रकरणी इमारतीच्या फारुक काझी आणि युनूस शेख या दोन्ही बिल्डरच्या नावे सदोष मनुष्यवधाचा  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखालून जवळपास ६० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. तर अद्यापही 18 जण जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहेयात 8 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे

घटनास्थळी असणारा ढिगारा उचलण्यासाठी सहा ते सात जेसीबी दाखल झाल्या आहेत. शिवाय एनडीआरएफच्या तीन टीमही घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. प्रशासन आणि सर्व यंत्रणांकरुन घटनास्थळी वेगात बचावकार्य सुरु आहे.

 

मागे

Unlock 4 | 1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार
Unlock 4 | 1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा विचार

1 सप्टेंबरपासून मेट्रोची सेवा टप्प्याटप्प्यानं सुरू करण्याचा केंद्राचा व....

अधिक वाचा

पुढे  

तीन वेळा वेगवेगळे कोरोना रिपोर्ट, मी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? तरुणाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न
तीन वेळा वेगवेगळे कोरोना रिपोर्ट, मी पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? तरुणाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

अहमदनगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिल....

Read more