By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 14, 2020 11:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
कोरोना काळात संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. कोरोनामुळे यंदाच्या अधिवेशनात अनेक बदल करण्यात आले आहेत. याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिली. कोरोनासाठी आवश्यक सर्व खबरदारी घेण्यात आली असून यावेळी अधिवेशनात शनिवार रविवारची सुट्टी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मोदींनी दिली. तसेच, कोरोनाची लस येईपर्यंत खबरदारी हाच पर्याय असल्याचंही मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले?
“कोरोना आहे, कर्तव्यही आहे आणि सर्व खासदारांनी कर्तव्याचा मार्ग निवडला आहे. मी सर्व खासदारांचे अभिनंदन करतो आणि धन्यवादही देतो. बजेट सत्र वेळेपूर्वीच थांबवावं लागलं होतं. यावेळीही दिवसातून दोनवेळी एकदा राज्यसभा एकदा लोकसभा होईल, वेळही बदलावा लागला आहे. शनिवार-रविवारही यावेळी रद्द करण्यात आले आहेत. पण, सर्व सदस्यांनी याचाही स्वीकार केला आहे, त्याचं स्वागत केलं आहे. कर्तव्याच्या मार्गावर पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे.”
“या सत्रात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होतील, अनेक विषयांवर चर्चा होईल आणि आम्हा सर्वांचा अनुभव आहे की लोकसभेत जेवढी जास्त चर्चा होते, तेवढा संददेला आणि देशाला फायदा होतो. यावेळीही त्या महान परंपरेत आम्ही सर्व खासदार मिळून भर घालू असा मला विश्वास आहे.”
“कोरोनामुळे जी परिस्थिती उत्पन्न झाली आहे, त्यामध्ये जी खबरदारी घ्यायला हवी त्या सर्वांचं पालन आम्हाला करावं लागणार आहे. जोपर्यंत औषध येत नाही तोपर्यंत खबरदारीला पर्याय नाही. जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी. आमच्या वैज्ञानिकांना यश मिळावं. जगात प्रत्येकाला या संकटातून बाहेर काढण्यात आम्हाला यश मिळेल”, असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.
“या सभेची आणखी एक विशेष जबाबदारी आहे. विशेषकरुन या सत्राची एक विशेष जबाबदारी आहे. आज जेव्हा आमच्या सेनेचे वीर जवान सीमेवर तैनात आहेत, दुर्गम ठिकाणी ते मोठ्या हिमतीने त्यांचं कर्तव्य पार पाडत आहेत. काही दिवसांनी हिमवर्षाही सुरु होईल. या परिस्थितीतही ते मातृभूमिच्या संरक्षणासाठी तत्पर आहेत. हे सदनही, सर्व सदस्य एकास्वरात, एक भावनेतून, एक संकल्पातून हा संदेश देईल की संपूर्ण देश या जवानांच्या पाठिशी आहे, असा मला पूर्ण विश्वास आहे”, असंही मोदी म्हणाले.
संसदेचं पावसाळी अधिवेशन
लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज यावेळी वेगवेगळं होईल. तसेच, यंदा प्रश्न-उत्तरांचा तासही होणार नाही. दुसरीकडे, LAC वर चीनसोबतचा तणाव आणि कोरोना या विषयांवर विरोधीपक्ष सरकार घेरण्याच्या तयारीत आहे. आज राज्यसभेत उपसभापतीपदाची निवडणुकही आहे. यासाठी एनडीएकडून हरिवंश आणि विरोधी पक्षातून मनोज झा मैदानात आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन 14 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत चालेल. यामध्ये कोव्हिड-19 प्रोटोकॉलचीही विशेष काळजी घेतली जाईल. यादरम्यान, सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या आहेत
गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाच्या ९२,०७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त....
अधिक वाचा