By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 23, 2020 03:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिक नेताजी सुभाष चंद्र बोस यांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. 'आझाद हिंद सेने'ची स्थापना करणाऱ्या नेताजींना मोदींनी खास पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत अभिवादन केलं आहे.
सुभाष चंद्र बोस यांच्या वडिलांच्या डायरीचा उल्लेख मोदींनी केला आहे. 'एका मुलाचा दुपारी जन्म झाला' असं नेताजींचे वडिल जानकीनाथ बोस यांनी २३ जानेवारी १८९७ मध्ये त्यांच्या डायरीत लिहिलं होतं. असं मोदींनी लिहिलं. हाच मुलगा भविष्यात स्वातंत्र्यसैनिक झाला. ज्यानं त्याचं संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं.
On 23rd January 1897, Janakinath Bose wrote in his diary, “A son was born at midday.”
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2020
This son became a valorous freedom fighter and thinker who devoted his life towards one great cause- India’s freedom.
I refer to Netaji Bose, who we proudly remember on his Jayanti today. pic.twitter.com/wp3UjudKJ4
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचं स्मरण करताना आम्हाला गर्व होत आहे, असंही मोदी म्हणाले. मोदींनी एक व्हिडिओ दोखील ट्विट केला आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेताजींच्या कार्याचा आणि बलिदानाचा उल्लेख करत देशातील प्रत्येक पिढीला ते प्रेरणा देत आहेत, असं म्हटलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी वाहिली श्रद्धांजली
'नेताजी सुभाष चंद्र बोस हे देशातील महत्त्वाच्या आणि लोकप्रिय स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक आहेत. त्यांच्या शब्दाखातीर लाखो भारतीयांनी स्वातंत्र्य लढ्यात आपलं योगदान दिलं. त्यांचं कर्तृत्व, बलिदान आपल्याला प्रेरणा देत राहिल', असं कोविंद यांनी म्हटलं आहे.
मुंबई - 'वी द पीपल...आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्....
अधिक वाचा