By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 09, 2020 03:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
गुवाहाटी - देशभरात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या (CAA) विरोधात ईशान्य भारतात आसामसह अनेक ठिकाणी विरोध होत आहेत. या विरोधामुळेच आसाममधील गुवाहाटी येथे होणाऱ्या खेलो इंडिया यूथ गेम्सच्या शुभारंभ कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणार नसल्याचे कळते. आयोजकांनी १० जानेवारी रोजी होणाऱ्या शुभारंभ कार्यक्रमासाठी पंतप्रधान कार्यालयाकडे आमंत्रण पाठवले असून यासंदर्भात PMO कडून अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.
दरम्यान, वेळ नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्याला येणार नसल्याचे क्रीडा मंत्रालय आणि आसाम सरकारला सांगितल्याचे कळते. पण प्रत्यक्षात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला होणाऱ्या विरोधामुळेच PM मोदी गुवाहाटीला जाणे टाळत असल्याचे बोलले जात आहे. राज्यातील विविध संघटनांनी पंतप्रधान मोदी जर या शुभारंभ सोहळ्यासाठी आले तर आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा दिला होता.
गुवाहाटी येथे होणाऱ्या तिसऱ्या खेलो इंडिया युथ स्पर्धेत ३७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील ६ हजार ८०० खेळाडू सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत २० खेळांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल गुवाहाटी येथील इंदिरा गांधी स्टेडियममध्ये होणाऱ्या शुभारंभ सोहळ्यात उपस्थित राहतील. या कार्यक्रमास अनेक स्टार खेळाडू देखील हजेरी लावणार आहेत. यात हिमा दासचा देखील समावेश आहे.
मुंबई - गँगस्टर एजाज लकडावाला याला बिहारच्या पाटणा येथून अटक कर....
अधिक वाचा