By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 19, 2020 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (19 मार्च) रात्री 8 वाजेच्या सुमारास देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक घेतल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर ते देशातील नागरिकांना संबोधित करणार आहेत.
पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटमार्फतही याबाबत माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी देशातील नागरिकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणती काळजी घ्यावी? त्याचा सामना करण्यासाठी काही सूचना देण्याची शक्यता आहे. याशिवाय कोरोनाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण गोष्टीदेखील ते सांगू शकतात. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष आता नरेंद्र मोदी यांच्या बोलण्याकडे असणार आहे.
PM Shri @narendramodi will address the nation on 19th March 2020 at 8 PM, during which he will talk about issues relating to COVID-19 and the efforts to combat it.
— PMO India (@PMOIndia) March 18, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याअगोदर 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजताच संपूर्ण देशाला संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी नोटबंदीसारखी मोठी घोषणा केली होती. त्या घोषणेनुसार देशातील तत्कालीन 1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या होत्या आणि नव्या नोटा देशाच्या चलनात आल्या होत्या.
जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असताना भारतात एक धक्कादायक माहिती सम....
अधिक वाचा