By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पंजाब अॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी बँक) खातेदार-ठेवीदारांनी रविवारी भांडुप येथील बैठकीत संचालक मंडळासह रिझव्र्ह बँकेविरोधात रिट याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर बँकेवरील आर्थिक र्निबध उठवून ठेवीदारांच्या ठेवींना पूर्ण संरक्षण मिळावे या मागणीसाठी 2 ऑक्टोबरला आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे.
रिझव्र्ह बँकेने लादलेल्या आर्थिक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी भांडुपच्या ड्रीम्स मॉल (बँकेच्या मुख्यालयाजवळ) येथे पीएमसीबीच्या ठेवीदार-खातेधारकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे निमंत्रक विश्वास उटगी, विवेक मॉन्टेरे आणि कॉ. सुगंधा फ्रान्सिस उपस्थित होत्या. या बैठकीत ठेवीदार-खातेदारांवर ओढवलेल्या परिस्थितीला बँकेच्या संचालक मंडळासह रिझव्र्ह बँकही तितकीच जबाबदार आहेत असा आरोप करण्यात आला. त्यामुळे रिझव्र्ह बँकेविरोधातही आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.
रिट याचिकेत संचालक मंडळासह रिझव्र्ह बँकेच ही नाव आरोप पत्रात टाकण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ठेवींना संपूर्ण संरक्षण, आर्थिक र्निबध उठवून बँकेचे पुनरुज्जीवन अशा प्रमुख मागण्या या रिट याचिकेत केल्या जातील, असे उटगी यांनी सांगितले.
जगातील सर्वाधिक ताकदवान सैन्याच्या यादीत भारतीय सैन्य चौथ्या क्रमांकावर ....
अधिक वाचा