By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 22, 2019 07:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रायगड
काल झालेल्या जोरदार पावसामुळे गोळेगणी येथील रस्ता वाहून गेला. परिणामी या मार्गावरील कुडपण, गोळेगणी, परसुले , तुटवली, क्षेत्रपाल या गावांचा संपर्क तुटला असून येथील बस सेवा बंद करण्यात आली आहे. याचा फटका येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यांना आता पायपिट करावी लागत आहे.
गोळेगणी रस्त्यावरून आजूबाजूचे पाणी जाऊ नये. यासाठी मोरीचे काम क गटातून करण्यात आले. स्थानिक ठेकेदार सिद्धेश चव्हाण यांनी 15 जून रोजी या कामाला सुरवात केली. लाखो रुपये या कामासाठी खर्च करण्यात आले. या कामाला 27 दिवस पूर्ण होण्याआधीच रस्ता मोरीसह उखडल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. यासंबंधी ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नाशिक शहरात महा मेट्रोच्या वतीने टायरबेस मेट्रो बस प्रकल्प साकारण्यात येत ....
अधिक वाचा