By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 14, 2020 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अहमदनगर
अमरावती- संपूर्ण भारतात बेरोजगारीने तरुणांच्या आत्महत्येचा विळखा घातला आहे. त्यातच महाराष्ट्र राज्यात गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार शेतकर्यांचपेक्षाही बेरोजगार युवकांची आत्महत्या आकडेवारी नुकतीच समोर आली. राज्यात शेतकर्यांचपेक्षा युवकांनी अधिक आत्महत्या असल्याचे दिसून आले आहे. बेरोजगार युवकांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने म्हणजेच महाविकास आघाडीच्या गृहविभागातर्फे मेगा भरती हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याच्या तयारीत गृहविभाग दिसत आहे. त्यामुळे या निर्णयानंतर लवकरच सात ते आठ हजार पदांवर पोलीस भरती होईल अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांचा ताण कमी होईल असे वाटत आहे.
कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे तसेच नक्षलवाद्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येतील असे देशमुख यांनी दिवंगत जे. डी. पाटील उपाख्या बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१ व्या पुण्यातीथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिलाविद्यालयातील आयोजित केलेल्या कार्यक्रमात उद्गार काढले.
दरम्यान, पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायली हवी असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच महाराष्ट्रात वाढलेल्या महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी सरकार लवकरच पाऊले उचलेल असे ही आवाहन त्यांनी त्यावेळी केले. पालकांनी मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे न लादता त्यांना प्रश्नांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न करायला हवे.
मुंबई : मुंबईत स्वस्त असलेले वाडिया रुग्णालय बंद करण्याचे चित्....
अधिक वाचा