ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये! माजी लष्करप्रमुख दीपक कपूर

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 12, 2019 12:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये! माजी लष्करप्रमुख दीपक कपूर

शहर : मुंबई

भारतीय जवानांनी केलेल्या लष्करी कारवाईचा राजकीय वापर होत असल्याने काही माजी सैनिक चांगलेच भडकले आहेत. याबाबत त्यांनी थेट राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे धाव घेतली असून त्यांना एक पत्रही लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी सैन्याच्या कामगिरीचे श्रेय राजकीय पक्षांनी घेऊ नये, असे आदेश त्यांना देण्यात यावेत, अशी विनंती केली आहे. हे पत्र लिहिणार्‍या 156 माजी सैनिकांमध्ये माजी लष्करप्रमुख दीपक कपूर यांच्यासह देशाच्या तिन्ही दलांच्या 8 माजी प्रमुखांच्या सह्या आहे. सध्या देशात निवडणुकीचे वातावरण आहे. दरम्यान, प्रचारादरम्यान सत्ताधारी भाजपाने सैन्याच्या कामगिरीवरुन मत मागण्याचा प्रयत्न अनेकदा केला आहे. हेच या अधिकार्‍यांना खटकले आहे, त्यामुळे त्यांनी थेट राष्ट्रपतींकडे धाव घेतली आहे.
त्याचबरोबर, लातूर जिल्ह्यातील औसा येथील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवमतदारांना आवाहन करताना पुलवामातील शहीदांची, पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये हवाई हल्ला करणार्‍या जवानांची आठवण ठेवताना, त्यांच्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले होते. इतकेच नव्हे त्यांच्यासाठी मत देताना ते कमळाच्या बटण दाबून द्यावे म्हणजे तुमचे मत मोदींना जाईन असे उघडपणे त्यांनी म्हटले होते. 
मोदींच्या या वक्तव्यावर यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक आयोगाने याकडे दुर्लक्ष केल्याने आता माजी लष्करी अधिकार्‍यांना थेट राष्ट्रपतींकडेच धावा घ्यावी लागली.

मागे

पुणे जिल्ह्यातील वाहनांची संख्या ६१ लाखांवर...
पुणे जिल्ह्यातील वाहनांची संख्या ६१ लाखांवर...

पुणे  जिल्ह्यात वाहनांच्या संख्येने ६१ लाखांचा टप्पा पार केला आहे. त्यामु....

अधिक वाचा

पुढे  

माहीममध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने  ३ कोटी रुपयांचे विदेशी चलन केले जप्त...
माहीममध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने ३ कोटी रुपयांचे विदेशी चलन केले जप्त...

मुंबईतील माहीममध्ये निवडणूक आयोगाच्या फिरत्या तपासणी पथकाने एका टॅक्सी....

Read more