By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 13, 2021 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी विरोधकांनी केलेली कारवाईची मागणी आणि सोशल मीडियातून उमटलेल्या प्रतिक्रियेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या प्रकरणाची माहिती दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. (pooja chavan suicide case: pune police commissioner amitabh gupta meets cm uddhav thackeray)
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने राजकीय वातावरण तापल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना वर्षा निवासस्थानी बोलावून घेतलं. गुप्ता यांनी वर्षावर येऊन पूजा आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची सर्व माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. आत्महत्या कशी झाली? प्रत्यक्ष साक्षीदारांच्या नोंदी, मेडिकल रिपोर्ट आदींची गुप्ता यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ऑडिओ क्लिपची माहिती घेतली
मुख्यमंत्र्यांनी यावेळी गुप्ता यांना ऑडिओ क्लिपबाबतची माहितीही विचारली. या क्लिप खऱ्या आहेत का? त्यातील आवाज मंत्र्याचा आहे का? या क्लिपमधील संभाषणाचा अर्थ काय निघतो? आदी माहिती मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आघाडीतील नेत्यांचं मुख्यमंत्र्यांकडे बोट
दरम्यान, गुप्ता यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री वन मंत्री संजय राठोड यांना भेटीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतलं आहे. गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनंतर आता अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेचे नेते आणि आघाडीतील इतर नेतेही या प्रकरणी मुख्यमंत्रीच निर्णय घेतील असं सांगत असल्याने मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला असून मुख्यमंत्री याप्रकरणी आज दिवसभरात काही ठोस निर्णय घेऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितलं.
राऊतांचा प्रतिक्रिया देण्यास नकार
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांना प्रसारमाध्यमांनी गाठून पूजा चव्हाण प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण राऊत यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच या प्रकरणावर प्रतिक्रिया देतील, असं त्यांनी ऑफ द रेकॉर्ड सांगून या प्रकरणावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. त्यानंतर राऊत हे नाशिकच्या दिशेने रवाना झाले. त्यामुळे मुख्यमंत्री या प्रकरणावर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (pooja chavan suicide case: pune police commissioner amitabh gupta meets cm uddhav thackeray)
सोमवारपासून खासगी रूग्णालयातील कर्मचाऱ्यांन लस देण्यात येणार आहे. १ मार्च....
अधिक वाचा