ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रगती एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस १५ ऑक्टोबरपर्यंत रद्द

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2019 01:23 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रगती एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस १५ ऑक्टोबरपर्यंत रद्द

शहर : मुंबई

मध्य रेल्वेने हाती घेतलेल्या काही दुरुस्तीच्या कामामुळे लांब पल्ल्याच्या २२ गाड्यांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे वेळापत्रक पुरते कोलमडणार आहे. तर प्रगती एक्स्प्रेस, कोयना एक्स्प्रेस या प्रमुख दोन गाड्या १५ ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार आहेत. दरम्यान, कोयना एक्स्प्रेस पुण्यात सोडण्यात येणार आहे. मुंबई - पुणे घाटात देखभाल-दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे

ऑगस्ट महिन्यातील मुसळधार पावसाळामुळे लोणावळा परिसरात दरड कोसळून १४ दिवस मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक बंद होती. दरड हटवल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरु झाली. यामुळे आगामी १० दिवस रेल्वे वाहतूकीवर परिणाम होणार असल्याने पुन्हा एकदा खासगी बसची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

दक्षिण-पूर्व घाटातील मंकी घाट आणि कर्जत परिसरात पाच ऑक्टोबर ते १५ ऑक्टोबर या काळात अप मार्गावर पायाभूत सुविधासाठी कामे करण्यात येत आहे. यामुळे आगामी दहा दिवस काही लांबपल्ल्यांच्या एक्स्पेस रद्द करण्यात येणार आहेत. काही गाड्या पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहेत.

रद्द केलेल्या गाड्या

- ५१०२७  मुंबई - पंढरपूर, १०, ११ आणि १२ या तारखेला.

- ५१०२८ पंढरपुर - मुंबई ११, १२, १३ या तारखेला.

- ५१०२९ मुंबई - बीजापूर,,,१३,१४ या तारखेला.

- ५१०२९  बीजापूर - मुंबई, ,,,१०, १४, १५ या तारखेला.

- ११०२९ मुंबई - कोल्हापूर, प्रवास 

- १२७०२ हैदराबाद-मुंबई

- ०७६१७ नांदेड-पनवेल

- ०७६१८ पनवेल-नांदेड

- १२१२६ पुणे-मुंबई,

- १२१२७ मुंबई-पुणे

दौंड-मनमाड येथून सुटणाऱ्या गाड्या

- ११०२५ भुसावळ-पुणे

- ११०२६ पुणे-भुसावळ

 

 

मागे

एचएसबीसी बँकेमधील १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता
एचएसबीसी बँकेमधील १० हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता

ब्रिटनच्या एचएसबीसी बँकेकडून लवकरच मोठ्याप्रमाणावर कर्मचारी कपात करण्या....

अधिक वाचा

पुढे  

वायुसेना दिवस : तीनही सेनाप्रमुखांकडून शहिदांना श्रद्धांजली
वायुसेना दिवस : तीनही सेनाप्रमुखांकडून शहिदांना श्रद्धांजली

आज वायुदेना दिवस आहे याचं औचित्य साधून गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसवर कार्....

Read more