By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 05:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : pandharpur
लोकसभा निवडणुकीत सध्या मांडण्यात येणारे सगळे अंदाज चुकणार असून यंदा निकाल वेगळे लागतील असा दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. वारंवार दुष्काळाशी सामना कराव्या लागणार्या पश्चिम महाराष्ट्रातील पाणी पळविणार्या बड्या ठेकेदारांना विधानसभेत पराभूत केल्यास दुष्काळाचा प्रश्न सुटेल असाही टोला आंबेडकर यांनी लगावला.
सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मतदानानंतर आज प्रकाश आंबेडकर हे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी दौर्यासाठी आले होते. महाराष्ट्रात अलीकडे सातत्याने दुष्काळ पडत असल्याने कायमस्वरूपी दुष्काळी उपाययोजनेची तयारी शासनाने करून ठेवणे आवश्यक असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात काही मंडळी सातत्याने पाणी पळवित असल्याने इतर जनतेच्या माथी हा दुष्काळ येत आहे. यामुळे या नेत्यांना निवडणुकीत हरवून तुमचा दुष्काळ हटवा, असे त्यांनी सांगितले. ब्रिटिशांनी कोकणातील नद्यांची तोंडे पश्चिम महाराष्ट्राकडे वळविल्याने येथे पाण्याचा उपलब्धता मोठी असली तरी नियोजनाच्या अभावामुळे सातत्याने दुष्काळाचे संकट येत असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.
नारायण राणेंच्या आत्मचरित्रामुळे जर का राजकीय भूकंप येत असेल तर त्याचा स....
अधिक वाचा