By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 05, 2020 11:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून विविध कॅबिनेट मंत्र्यांनीही याबाबत अनेकदा भाष्य केलं. अशा आर्थिक संकटाच्या स्थितीतच राज्य सरकारने शालेय शिक्षण मंत्र्यांसाठी जवळपास 23 लाख रुपये किमतीच्या इनोव्हा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागेल - मंत्री @VijayWadettiwar
— Pravin Darekar - प्रविण दरेकर (@mipravindarekar) July 3, 2020
शालेय शिक्षण मंत्री @VarshaEGaikwad व इतर मंत्र्यांसाठी ६ नव्या गाड्या खरेदीसाठी मान्यता - @CMOMaharashtra शासन निर्णय
उद्धवा अजब तुझे सरकार! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
राज्य सरकारच्या वाहन आढावा समितीने विशेष बाब म्हणून या वाहन खरेदीसाठी परवानगी दिली आहे. विशेष म्हणजे या समितीसमोर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे, शिक्षण अपर सचिव आणि कार्यालयीन वापरासाठी एक अशा एकूण 6 गाड्या खरेदीचे प्रस्ताव विचाराधीन होते. यापैकी शालेय शिक्षणमंत्र्यांच्या वाहन खरेदीला मंजुरी मिळाली आहे. या इनोव्हा गाडीची किंमत (जीएसटी आणि इतर मिळून) 22 लाख 83 हजार रुपये आहे.
ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. तसेच सरकारच्या निर्णयातील विरोधाभास लक्षात आणून दिला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे, “कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागेल असं म्हणतात. तर दुसरीकडे राज्य सरकार शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि इतर मंत्र्यांसाठी 6 नव्या गाड्या खरेदीसाठी मान्यता देते.
पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथी....
अधिक वाचा