ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर टेबलचं प्री-बुकींग आवश्यक; महापालिकेची नियमावली जारी

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑक्टोबर 03, 2020 08:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर टेबलचं प्री-बुकींग आवश्यक; महापालिकेची नियमावली जारी

शहर : मुंबई

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशासह राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यानंतर संर्व उद्योगधंदे आणि व्यवसाय ठप्प झाले. त्यानंतर सुरु झालेल्या अनलॉकच्या प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरु करण्यात येत आहेत. अनलॉक-5 च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील गाइडलाइन्स महाराष्ट्र सरकारने जारी केली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.

राज्यासरकारच्या गाइडलाइन्सनुसार मुंबईतही 5 ऑक्टोबरपासून हॉटेल्स, रेस्टरंट्स आणि बार सुरु करण्यात येणार आहेत. अशातच त्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नियमावलीसोबतच मुंबई महानगर पालिकेने इतरही काही नियम जारी केले आहेत. त्यामुळे मुंबईतील हॉटेल मालकांना राज्य सरकारच्या नियमावलीसोबतच मुंबई महानगर पालिकेच्या नियमांचंही पालन करावं लागणार आहे.

मुंबई महानगरपालिकेने हॉटेल मालकांना जारी केलेली नियमावली :

मुंबईतले हॉटेल-रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री-बुकींग आवश्यक

ठरावीक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये येऊ शकणार नाही

दोन टेबलमध्ये 2 ते 3 फुटांचे अंतर आवश्यक

टेबल आणि किचनची वेळोवेळी स्वच्छता होणं गरजेचं आहे

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकिय चाचणी आणि कोविड टेस्ट करणंही गरजेचं असेल

ग्राहकांची हॉटेलमधील गर्दी टाळण्यासाठी प्री-बुकींग आणि पार्सल पद्धतीवरच भर देण्याबाबत महापालिकेच्या वतीने सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबतची नियमावली महापालिका जारी करणार असल्याचं मुंबई महापालिका अतिरीक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, कोरोना रुग्णांची संख्या एकीकडे वाढत असली तरी दुसरीकडे अनलॉक प्रक्रीयेदरम्यान हॉटेल-रेस्टॉरंटस् खुले केले जाणार आहेत. अशातच, कोरोना संक्रमणाचा धोका टाळण्यासाठी मुंबई महापालिकेची नियमावली हॉटेल मालकांना आणि ग्राहकांनाही पाळावी लागणार आहे.

काय आहे अनलॉक 5 मध्ये?

अत्यावश्यक वस्तूंच्या कारखान्याशिवाय अन्य उत्पादनाचे उद्योग ही सुरु करण्यास परवानगी

राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी

ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही

डब्बेवाल्यांना लोकलमधून प्रवासाची परवानगी

मुंबई महानगर प्रदेश MMR मधील लोकल फेऱ्या वाढवाव्या

पुणे विभागातील लोकल व ट्रेन सुरू होणार

काय बंद राहणार?

शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क

मागे

हाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने
हाथरस अत्याचार : जंतरमंतरवर तीव्र असंतोष, योगी सरकारविरोधात निदर्शने

हाथरस घटनेनंतर देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता हाथरस बलात्कारप्रकरणी....

अधिक वाचा

पुढे  

देशात कोरोना बळींची संख्या 1 लाखांच्या पार; रोज सरासरी हजार रुग्णांचा मृत्यू
देशात कोरोना बळींची संख्या 1 लाखांच्या पार; रोज सरासरी हजार रुग्णांचा मृत्यू

देशात कोरोना बळींची संख्या 1 लाखांच्या पार गेली आहे. देशात कोरोनाबाधित रुग्....

Read more