By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 21, 2020 11:07 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
अयोध्येत राम मंदिर उभारण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. राम मंदिर बांधण्यासाठी ५ ऑगस्टला भूमिपूजन होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित मंदिर बांधकाम पायाभरणी कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहतील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे.
या सोहळ्याला मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ चालक मोहन भागवत यांच्यासह ३०० जणांना निमंत्रण पाठविण्याची तयारी सुरु झाली आहे. या व्यतिरिक्त अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही या खास कार्यक्रमात भाग घेतील. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांचादेखील या यादीत समावेश आहे.
अयोध्यामधील पुजार्यांनी तीन दिवसीय वैदिक अनुष्ठानांसह तीन ऑगस्टला रामजन्मभूमी साइटवर सोहळ्यासाठी मोठा आराखडा तयार केला आहे. दि. ४ ऑगस्टला रामाचार्य पूजा होईल. यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२:१५ वाजण्याच्या भूमिपूजन आयोजित केले जाईल. मोदी यांची अयोध्या आणि राम मंदिर परिसराची ही पहिली भेट असेल. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापण्याची घोषणा केली होती.
भूमिपूजन सोहळ्यादरम्यान मंदिर गाभाऱ्यासाठी पाच चांदीच्या विटा लावल्या जातील, त्यामध्ये पंतप्रधान मोदी प्रथम वीट लावतील. हिंदू पुराणकथांनुसार ५ विटा ५ ग्रहांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. विश्व हिंदू परिषदेने (VHP) प्रस्तावित केलेल्या आधारे मंदिराची रचना आणि वास्तुकला ठेवण्यात आले आहे. मंदिराची रचना विष्णू मंदिराच्या शहर शैलीची असेल. तर मंदिर गाभारा अष्टकोनी असेल.
पूर्वीच्या मॉडेल्सच्या तुलनेत मंदिराची लांबी-रुंदी वाढविली गेली आहे. त्याशिवाय प्रथम ती घुमट बसविण्यात येणार होते, जे आता ५ घुमट असतील. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे हे तीन दशकापासून राम मंदिर आंदोलनाशी निगडीत होते. यावर्षी मार्चमध्ये उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत भेट दिली आणि रामंदिरच्या बांधकामासाठी एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली. त्यांचा पक्ष हिंदुत्वासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत भाजपसोबत युतीतोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी घोषणा केली होती.
पुण्यात वाढते कोरोना रुग्ण आणि त्यासाठी आवश्यक बेड उपलब्ध नसल्याने जिल्हा....
अधिक वाचा