ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निर्भया: राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याने अखेर मुकेश सिंहला फाशी होणार

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 02:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30

निर्भया: राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळल्याने अखेर मुकेश सिंहला फाशी होणार

शहर : delhi

       नवी दिल्ली - निर्भया प्रकरणात फाशीसाठी दोषी ठरविण्यात  आलेल्या मुकेश सिंग याची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळून लावली आहे. ही दया याचिका यापूर्वी गृहमंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठवली होती. या प्रकरणात, मुकेश याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने खालच्या न्यायालयातील डेथ वॉरंट फेटाळण्याची मागणी या याचिकेद्वारे केली होती.


     सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर आरोपींनी फाशीपासून बचाव व्हावा म्हणून अखेरचा मार्ग म्हणून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ही याचिका अर्थात सुधारणा याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटळली होती. त्यामुळे त्याची फाशी आता कायम राहणार आहे.


    या प्रकरणीतील दोषींना २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही असे पतियाला हाऊस कोर्टाने निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणात म्हटले होते. दोषी मुकेश सिंह याचा दयेचा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने स्पष्ट केले होते. दरम्यान, तुरुंग प्रशासनाने १७ जानेवारीपर्यंत फाशीच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती द्यावी, असे आदेश दिल्ली कोर्टाने तिहार तुरुंग प्रशासनाला दिले होते. 


     दरम्यान, तुरुंग प्रशासनाने माहिती दिल्यानंतर पुढील निर्देश दिले जातील, असं कोर्टाने म्हटले होते. दयेचा अर्ज प्रलंबित असल्यानंतर डेथ वॉरंटवर आपोआप स्थगिती येते. हे लक्षात घेता फाशी देण्याची नवी तारीख काय असेल, हे तुरुंग प्रशासनाच्या उत्तरानंतर ठरणार आहे.
 

मागे

यंदा हापूस बाजारात उशिराने दाखल होणार
यंदा हापूस बाजारात उशिराने दाखल होणार

       रत्नागिरी - यावर्षीच्या हवामान बदलाचा चढ-उतार पाहता पिकांना चांग....

अधिक वाचा

पुढे  

...म्हणून बीसीसीआयने धोनीला करारातून वगळले 
...म्हणून बीसीसीआयने धोनीला करारातून वगळले 

          मुंबई - बीसीसीआयने भारतीय खेळाडूंसोबतच्या वर्षभरासाठीच्या क....

Read more