By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 19, 2020 10:44 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conferencing) असोचॅम (असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया) च्या फाऊंडेशन वीकच्या निमित्ताने बोलणार आहेत. गुरुवारी पीएमओच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली. त्यामुळे मोदी आज काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) दिलेल्या माहितीनुसार, पीएम मोदी फाउंडेशन सप्ताच्या निमित्ताने रतन टाटा यांना ‘असोचॅम एंटरप्राइज ऑफ द सेंचुरी अवॉर्ड’ देखील प्रदान करणार आहेत. टाटा समूहाच्या वतीने ते हा पुरस्कार घेतील. या खास सोहळ्याकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.
असोचॅमची (ASSOCHAM) स्थापना 1920 मध्ये देशातील सर्व प्रांतांचे प्रतिनिधित्व करणारे प्रवर्तक मंडळे यांनी केली होती. या संस्थेमध्ये 400 हून अधिक चेंबर्स आणि कामगार संघटनांचा समावेश आहे. देशभरात याचे साडेचार लाखाहून अधिक सभासद आहेत. ही संस्था प्रामुख्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केली गेली. यामुळे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे
भारतीय वायूदलात नव्यानेच दाखल झालेली राफेल लढाऊ विमाने (Rafael jets) आता पुन्हा एक....
अधिक वाचा