ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2020 10:55 AM 2019-02-12T14:15:30+5:30

खासगी बस वाहतूकदारांना 100 टक्के प्रवासी वाहतुकीची परवानगी

शहर : मुंबई

राज्य परिवहन महामंडळानंतर आता दिवाळीच्या गर्दीचा हंगाम लक्षात घेता खासगी बस वाहतूकदारांना सुद्धा 100 टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. मात्र, यासाठी खासगी बस वाहतुकदारांना केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे लागणार आहे.

महाराष्ट्र मोटार वाहन अधिनियम 1989 च्या नियम 20 (1) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनांच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ व निर्जंतुकीकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलतांना तसेच प्रवाशांच्या प्रत्येक दिवशी प्रत्येक फेरी अंती प्रवासी बसचे निर्जंतुकीकरण करावे लागणार आहे.

बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय चौकशी कक्ष यांची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क सॅनिटायझरचा वापर करावा, बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बस मध्ये प्रवेश देण्यात येऊ नये, बसच्या प्रवेशद्वाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे, तसेच बसमध्ये प्रवाशांच्या वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावे. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करण्यात यावी एखाद्या प्रवाशास ताप , सर्दी, खोकला, अशा प्रकारचे कोविड 19 चे प्राथमिक लक्षण दिसत असल्यास अशा प्रवाशांना बस मधून प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात येणार आहे.

हे नियम पाळावे लागतील

खासगी कंत्राटी बस वाहनांमधून 100 टक्के क्षमतेने पर्यटक प्रवासी वाहतुकीस परवानगी

चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोहार, प्रसाधनगृहासाच्या वापर याकरिता बस थांब्यावरील ठिकाणे स्वच्छ ठेवणे

बसमध्ये चढतांना,उतरताना तसेच प्रवासादरम्यान खानपानाकरिता व प्रसाधनगृहाच्या वापराकरीता बस थांबलेली असतांना प्रवाशांनी शारीरिक अंतर ठेवणे,

प्रवासी बस चे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवाना धारकाची असेल

मास्क न घातलेल्या प्रवाशांना परवानगी नाही

तिकीट /चौकशी खिडकी स्वच्छ असली पाहिजे

प्रवासाच्या आधी प्रवाशांच्या शरीराचे तापमान तपासावे.

ताप,खोकला,सर्दी असल्यास प्रवासास परवानगी नाही

नियमांचे पालन न केल्यास कारवाई

उपरोक्त सूचनांचे पालन न केल्यास परवानगी धारकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम 1988 केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार उचित कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

                                

मागे

अर्णब गोस्वामींविरोधात न्यायालयात आज दोन सुनावण्या
अर्णब गोस्वामींविरोधात न्यायालयात आज दोन सुनावण्या

रिपब्लीक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर आज हाय कोर्....

अधिक वाचा

पुढे  

गर्भवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार, रात्रभर थंडीत बसली महिला!
गर्भवतीला जिल्हा रुग्णालयात दाखल करुन घेण्यास नकार, रात्रभर थंडीत बसली महिला!

गर्भवती महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार दिल्याने रात्रभ....

Read more