ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...तर खाजगी डॉक्टरांवर कारवाई होणार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 26, 2020 06:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...तर खाजगी डॉक्टरांवर कारवाई होणार

शहर : मुंबई

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन केलं असलं तरी वैद्यकीय सेवेला अत्यावश्यक सेवा म्हणून सूट त्यातून देण्यात आली आहे. असं असलं तरी अनेक ठिकाणी खाजगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने बंद ठेवले आहेत. अशा डॉक्टरांवर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे.

मुंबई, कल्याण, डोंबिवली शहरांपासून ते ग्रामीण भागात अनेक डॉक्टरांनी दवाखानेही लॉकडाऊन केले आहेत. कोरोनाच्या भीतीनं अनेक डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद ठेवल्यानं आजारी नागरिकांची गैरसोय होत आहे.

डॉक्टरांकडे रोज अनेक रुग्ण येतात. त्यात सर्दी, ताप, खोकल्याचे रुग्णही असतात. तसेच दवाखान्यात येताना रुग्ण मास्क घालून येतीलच असे नाही. एखादा कोरोनाबाधित रुग्ण आल्यास संसर्ग व्हायला नको, म्हणून अनेक ठिकाणी डॉक्टरांनी दवाखानेच बंद ठेवलेत.

दवाखाने बंद असल्यानं लोकांना छोट्याशा आजारासाठीही सरकारी किंवा खाजगी रुग्णालयात जावं लागत आहे. या रुग्णालयांतही रुग्णांची गर्दी होत असल्यानं व्यवस्थेवर ताण पडत आहे.

सांगली, बुलढाणा जिल्ह्यात असे प्रकार लक्षात आल्यानंतर तिथे प्रशासनानं डॉक्टरांवर कारवाईचा इशारा दिला आहे. सांगलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय साळुंखे यांनी दवाखाने बंद ठेवण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवू नयेत.खाजगी डॉक्टरांनी दवाखाने बंद ठेवले तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. डॉक्टरांची सरकारकडे असलेली नोंदणी रद्द केली जाईल, असा इशारा डॉक्टर साळुंखे यांनी दिला आहे. डॉक्टरांनी शिस्तभंगाची कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये, असंही डॉक्टर साळुंखे यांनी म्हटलंय. बुलढाण्यातही अनेक खाजगी दवाखाने बंद आहेत. त्यामुळे बुलढाण्याच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनीही खाजगी डॉक्टरांवर करवाईचा इशारा दिला आहे.

 

मागे

राज्यातील मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी - उपमुख्यमंत्री अजित पवार
राज्यातील मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी - उपमुख्यमंत्री अजित पवार

‘कोरोना‘च्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन’मुळे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या ट....

अधिक वाचा

पुढे  

कोरोना झाल्याच्या भीतीने सरकारी कर्मचाऱ्याची आत्महत्या
कोरोना झाल्याच्या भीतीने सरकारी कर्मचाऱ्याची आत्महत्या

देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वा....

Read more