ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईकर तरुणांनो, मतदार यादीत नाव नोंदवा, मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 18, 2020 10:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईकर तरुणांनो, मतदार यादीत नाव नोंदवा, मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

शहर : मुंबई

मुंबईत मतदार यादीचा पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाकडून 17 नोव्हेंबर ते 15 ‍डिसेंबर 2020 या कालावधीत हरकती आणि दावे स्वीकारण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत ज्या मतदारांची मतदार म्हणून नोंदणी झाली नाही आणि ज्यांचे वय 1 जानेवारी 2021 रोजी 18 वर्ष पूर्ण होत आहे त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा नागरिकांनी फॉर्म 6 भरुन द्यावा, असं आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे

मृत आणि स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे मतदार यादीतून कमी करण्यात येणार आहेत. त्यासाठी फॉर्म 7 भरुन द्यावा लागणार आहे. तसेच मतदार यादीत नाव, वय, लिंग या बाबी चुकीच्या नोंदवल्या असल्यास त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी फॉर्म 8 भरुन द्यावा लागणार आहे.

या मोहिमेमध्ये मतदार यादी अचूक आणि निर्दोष होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी www.nvsp.in या पोर्टलवर भेट द्यावी लागेल. अधिक माहितीसाठी 1950 या टोल फ्री क्रमांकाचा वापर करता येणार आहे. मतदार यादीत नवीन मतदारांची नावे समाविष्ट करणे अथवा नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात येत आहे.

मागे

मुंबईत समुद्र आणि नदीकिनारी छटपूजा करण्यास बंदी; महापालिकेने जारी केली नियमावली
मुंबईत समुद्र आणि नदीकिनारी छटपूजा करण्यास बंदी; महापालिकेने जारी केली नियमावली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने महत्त्वाच निर्णय घेतला आहे. य....

अधिक वाचा

पुढे  

नागपूर पदवीधर निवडणूक : 19 उमेदवारांमध्ये रंगणार सामना, 7 जणांनी अर्ज घेतले मागे
नागपूर पदवीधर निवडणूक : 19 उमेदवारांमध्ये रंगणार सामना, 7 जणांनी अर्ज घेतले मागे

नागपूर पदवीधर मतदार संघात आता 19 उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. कारण अखेरच्या....

Read more