By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2019 08:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
इनकम टॅक्स रिटर्न (Income Tax Return) करण्यापासून ते आर्थिक देवाण घेवाण करण्यासाठी पॅन क्रमांक महत्त्वाचा असतो. मात्र बऱ्याच वेळा कोणतेही सरकारी फॉर्म भरताना पॅन क्रमांक चुकीचा भरला जातो. मात्र आता एक महत्त्वाचा निर्णय पॅन कार्डबाबत घेण्यात आला आहे. त्यामुळं तुमचा पॅन क्रमांक बरोबर भरा नाहीतर 10 हजारांचा दंड भरावा लागणार आहे.
आयकर विवरणसाठी (Income Tax Return) पॅन क्रमांक महत्त्वाचा असतो. मात्र आता आयकर कायदा 1961च्या (Income Tax Act, 1961) 272Bनुसार आयकर भरताना चुकीचा पॅन क्रमांक टाकल्यास 10 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. त्यामुळं आयकर भरताना ग्राहकांचा बरोबर पॅन क्रमांक टाकणे गरजेचे आहे.
या ठिकाणी लागू होणार नवा नियम
आयककर विभागातील हा नियम विविध ठिकाणीही लागू होतो. त्यामुळं पैशांची देवाण-घेवाण करताना पॅन क्रमांक चुकीचा असल्याचा फटका बसू शकतो. सध्या, आयकर विवरणच्या 20 कामांसाठी पॅन क्रमांक अनिवार्य आहे. यात बॅंक खाते तयार करताना, वाहन खरेदी करताना, म्युचुअल फंड खरेदी करताना, शेअर, बॉन्ड, डिबेंचर यासांठी महत्त्वाचा आहे. तसेच, एकदा पॅन कार्ड काढल्यानंर पुन्हा दुसऱ्या क्रमांकाचा पॅन कार्ड काढू शकत नाही.
कर विभागाच्या नियमांनुसार, कोणत्याही व्यक्तीला एकपेक्षा जास्त पॅन कार्ड ठेवण्याची अनुमतीनाही आहे. आयकर कायदा 1961 272Bनुसार कोणत्या व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असल्याच 10 हजारांचा दंड भरावा लागू शकतो. त्यामुळं जर तुमच्याकडे 2 पॅन कार्ड असतील तर एक कर विभागाकडे सुपर्द करा. तसेच, जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नसतील तर त्यासाठी 31 डिसेंबर 2019 ही शेवटची तारिख आहे. त्यानंतर तुमचे पॅन कार्ड अवैध ठरवले जाईल.
ज्येष्ठ गायिका, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णा....
अधिक वाचा