ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पीएसएलव्ही सी-४५ अंतराळात झेपावलं, ठेवणार शत्रूवर नजर

By GARJA ADMIN | प्रकाशित: एप्रिल 01, 2019 01:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पीएसएलव्ही सी-४५ अंतराळात झेपावलं, ठेवणार शत्रूवर नजर

शहर : मुंबई

#PSLVC45 मिशन शक्तीनंतर भारत आणखी एका महत्त्वाच्या कामगिरीसाठी तयार झाला असून, नुकतच श्रीहरिकोटा येथे त्याचा प्रत्यय पाहायला मिळाला. सोमवारी सकाळी वाजून २७ मिनिटांनी . ज्यामध्ये श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी-४५ ने अंताराळात झेप घेतली. यासोबत इतर २८ उपग्रहसुद्धा अंतराळात सोडण्यात आले. एमिसॅट अर्थात EMISAT या उपग्रहासोबतच काही परदेशी उपग्रहांचंसुद्धा प्रक्षेपण करण्यात येणार आहे.पीएसएलव्ही सी-४५ EMISAT या मुख्य उपग्रहासह एकूण २९ उपग्रहांचं प्रक्षेपण करण्यात आलंयात अमेरिकेचे २४, भारताचा , ल्युनिनियाचे , स्वित्झर्लंडचा आणि स्पेनचा अशा उपग्रहांचा समावेश आहे. श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून या उपग्रहांचं प्रक्षेपण केलं जाणार आहे.. यातील EMISAT  हा उपग्रह भारतासाठी खास असणार आहे कारण या उपग्रहाच्या सहाय्याने भारताला शत्रूच्या रडारची माहिती सहज मिळणार आहे.

पीएसएलव्ही C45 हे एक हा एक असा उपग्रह आहे, जो त्याच्या चौथ्या रॉकेट स्टेजमध्ये (PS4) सोलर पॅनलचा वापर करणार आहे. यामध्ये एकूण तीन पेलोड्स आहे. ज्यामध्ये ऍमसॅट अर्थात (रेडिओ ऍमॅच्युअर सॅटेलाईट कॉर्पोरेशन)ची ऑटोमॅटीक रिपोर्टींग सिस्टीम (APRS), इस्रोची ऑटोमॅटीक आयडेंटीफिकेशन सिस्टीम आणि भारतीय अंतरिक्ष विज्ञान आणि प्रौद्योगिकी संस्थेच्या अद्ययावत रिटार्डींग पोटेंशिअल ऍनालायझर (ARIS) चा समावेश आहे.

पीएसएलव्ही मालिकेतील हे ४७ वं मिशन ठरलं आहे. सर्वप्रथम एमिसॅट अंतराळात  ७४९ किमीच्या कक्षेत प्रक्षेपित केला जाणार आहे. पुढे हे अंतर कमी करत त्याला उर्वरित २८ उपग्रहांच्या प्रक्षेपणासाठी ५०४ किमी अंतरापर्यंत उतरवण्यात येणार असल्याचं कळत आहे. उपग्रह प्रक्षेपणाच्या या संपूर्ण प्रक्रियेसाठी एकूण १८० मिनिटांचा कालावधी लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं

मागे

 “बायोमॅट्रीक ओळख क्रमांक” असलेला “आधार” - पॅन लिंक करण्यासाठी नागरिकांना आणखी एक संधी
“बायोमॅट्रीक ओळख क्रमांक” असलेला “आधार” - पॅन लिंक करण्यासाठी नागरिकांना आणखी एक संधी

बायोमॅट्रीक ओळख क्रमांक' असलेला 'आधार' आणि पॅन कार्ड लिंक करण्याच्या मु....

अधिक वाचा

पुढे  

जॉन्सन एन्ड जॉन्सन 'बेबी केअर शॅम्पू'मुळे कॅन्सरचा धोका
जॉन्सन एन्ड जॉन्सन 'बेबी केअर शॅम्पू'मुळे कॅन्सरचा धोका

प्रत्येक आई-वडील आपलं बाळ सुदृढ राहावं आणि प्रत्येक धोक्यापासून दूर राहावं....

Read more