ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबई-पुण्यात लॉकडाउनला नागरिकांची पाठ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 23, 2020 02:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबई-पुण्यात लॉकडाउनला नागरिकांची पाठ

शहर : मुंबई

जमावबंदीच्या आदेशाला मुंबईकरांनी हरताळ फासल्याचे दृश्य दिसून येत आहेत. ठाण्यातून मुंबईला येणाऱ्या गाड्यांच्या चेकनाक्यावर लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. करोनामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती असतानाही लोक गांभीर्याने घेत नाही आहेत. मुलुंड चेकनाक्यावर या गाड्या पोलिसांनी अडवल्या. मात्र, यावेळी काही मुंबईकरांनी पोलिसांशी हुज्जतही घातली.

राज्यात जमावबंदीचे आदेश आहेत. या आदेशाचा भंग केल्यास वाहनं जप्त करण्यात येतील असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिला आहे. अशीच परिस्थिती पुण्यात देखील आहे. तर नागरिकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये असे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. रस्त्यावर गाड्यांची गर्दी पाहता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक बंद केली होती.

रविवारच्या जनता कर्फ्यू ला पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र आज मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडले आहेत. रेल्वे एसटी विमानसेवा बंद असले तरी शहरांतर्गत वाहतूक सुरू आहे. लोक खाजगी वाहनांचा वापर करत आहेतत्यासाठी शहरात कलम १४४ लागू करण्यात आलेल आहे.

नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेल आहे. असं असताना शहरात गाड्या धावताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत आज दुपारनंतर शहरातील वाहतूक थांबवण्याबाबत विचार सुरू आहे. त्याबाबतचे आदेश एक क्षणी निघू शकतात.

 

 

मागे

कोरोनाबाबत लोकं गंभीर नाहीच, पंतप्रधान मोदींकडून नाराजी व्यक्त
कोरोनाबाबत लोकं गंभीर नाहीच, पंतप्रधान मोदींकडून नाराजी व्यक्त

देशात कोरोना प्रकरणे सतत वाढत आहेत. देशातील दहापेक्षा जास्त राज्यात सरकारन....

अधिक वाचा

पुढे  

राज-उद्धव यांचं फोनवरुन बोलणं, मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांची एक सूचना
राज-उद्धव यांचं फोनवरुन बोलणं, मुख्यमंत्र्यांना राज ठाकरे यांची एक सूचना

केंद्र आणि राज्य सरकारने कोरोनाबाबत घेतलल्या खबरदारीबाबत मनसे अध्यक्ष रा....

Read more