By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 02, 2020 08:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
विधानपरिषदेतील 12 राज्यपालनियुक्त सदस्यांच्या निवडीला होत असलेल्या विलंबामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे. याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यपाल यावर काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्राथमिक माहितीनुसार, अधिवक्ते राज पाटील यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. 12 राज्यपाल नियुक्ती विधान परिषद आमदार च्या नियुक्तीला होत असलेला विलंब, भारतीय संविधानानुसार उमेदवारांची पात्रता आदी विषय याचिकेत नमूद करण्यात आले आहेत. तसेच विधानपरिषदेतील आमदारांची निवड ही संवैधानिक पात्रतेनुसार नव्हे तर राजकीय आधारावर केली जाते, यावरही आक्षेप नोंदवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांकडे 12 सदस्यांची यादी देऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी त्यानंतर कोणत्याही हालचाली केलेल्या नाहीत. त्यामुळे महाविकासआघाडीचे नेते राज्यपालांना अधूनमधून याची आठवण करुन देत असतात.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी राज्यपालांनी विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली होती. राज्य मंत्रिमंडळाने सुचविलेली 12 नावे योग्य आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळाने केलेल्या सूचना राज्यपाल डावलत नाही, अशी प्रथा आपल्याकडे आहे. मात्र, पूर्वापार चालत आलेल्या व्यवस्था आणि प्रथा मोडण्यात भाजपचा हातखंडा आहे. परंतु, राज्यपाल हे स्वतंत्र विचारांचे असल्याने ते लवकरच मंत्रिमंडळाने सुचविलेल्या नावांना मान्यता देतील, अशी खोचक टिप्पणीही जयंत पाटील यांनी केली होती.
‘झहीर खान, मकरंद अनासपुरे, इंदोरीकरांना आमदार करा’
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी रयत क्रांती संघटनेकडून राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची नावे सुचविली होती. यामध्ये मकरंद अनासपुरे, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. तात्याराव लहाने, निवृत्ती महाराज इंदोरीकर, क्रिकेटर झहीर खान, अमर हबीब, पोपटराव पवार, विठ्ठल वाघ, विश्वास पाटील, सत्यपाल महाराज, बुधाजीराव मुळीक, मंगलाताई बनसोडे यांचा समावेश होता.
पश्चिम रेल्वेवरील पालघर आणि सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी (Palghar Passe....
अधिक वाचा