ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन  

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 06:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन   

शहर : मुंबई

निवडणूकविषयक कायदेआचारसंहितानिवडणूकविषयक गुन्हेईव्हीएम- व्हीव्हीपॅट यासह निवडणूक प्रक्रियेबाबत समग्र माहितीचा समावेश असलेल्या 'निवडणूकविषयक कायदे आणि प्रक्रियाया पुस्तकाचे प्रकाशन काल भारत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या हस्ते झाले. राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे (भा.प्र.से.) हे या पुस्तकाचे लेखक आहेत.

श्री. अरोरा यांच्यासह निवडणूक आयुक्त अशोक लवासासुशील चंद्रावरीष्ठ उप निवडणूक आयुक्त संदीप सक्सेनाउमेश सिन्हाउप निवडणूक आयुक्त चंद्रभूषण कुमारसुदीप जैनराज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काल मुंबईत राज्यातील विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला. त्यावेळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तकाला श्री. अरोरा यांची प्रस्तावना असून राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहतामुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

निवडणूक प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत तसेच राजकीय कार्यकर्ते ते सर्वसामान्य मतदार अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे. पुस्तकात निवडणूक आयोगाची माहितीमतदार नोंदणी प्रक्रिया आणि ओळखपत्रेउमेदवारांची पात्रताशासकीय मालमत्तेचे विद्रुपीकरणास बंदीआचारसंहितानिवडणूक विषय गुन्हेराजकारणातील गुन्हेगारीस प्रतिबंधप्रशासकीय यंत्रणाइलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन (ईव्हीएम)टपाली मतदानकायद्यातील नव्या सुधारणापेड न्युजउमेदवारांसाठी एक खिडकी योजना आणि मतदान जागृती कार्यक्रम याबाबत सविस्तर आणि सचित्र माहिती समाविष्ट आहे.

मागे

पाच प्रकारच्या किटकनाशकांच्या विक्री, वितरण, वापरास बंदी - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे
पाच प्रकारच्या किटकनाशकांच्या विक्री, वितरण, वापरास बंदी - कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे

किटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व शेतमजुरांना विषबाधा झालेल्या घटनेची गं....

अधिक वाचा

पुढे  

'पुस्तकांचे गांव' भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार
'पुस्तकांचे गांव' भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार

मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी ....

Read more