By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 06, 2019 10:19 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
निगडी प्राधिकरण या उच्चभ्रू परिसरात असलेल्या नामांकित रुग्णालयात धक्कादायक घटना समोर आली आहे. दाताचे दुखणे समोर आल्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल झालेल्या रुग्णाचा अतिरक्तस्राव होऊन मृत्यू झाला आहे. धनश्री जाधव असे २३ वर्षीय मुलीचे नाव असून, याप्रकरणी धनश्रीच्या नातेवाईकांनी निगडी पोलिसात डॉक्टरांनी केलेल्या निष्काळजीपणाची तक्रारी अर्ज दाखल केली आहे.
काही दिवसांपासून धनश्रीचे दात प्रचंड दुखत होते, त्यामुळे तिला निगडीतल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दातावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर रक्तस्राव झाला. डॉक्टरांना वारंवार विनंती करूनही त्यांनी लक्ष दिलं नाही, असा आरोप धनश्रीच्या आई-वडिलांनी केला आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे धनश्रीचा मृत्यू झाल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी निगडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. निगडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. रुग्णालयातल्या डॉक्टरांवर काय कारवाई करावी? याचा विचार निगडी पोलीस करत आहेत. ज्या डॉक्टरांनी उपचार केले, ते फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
रशियाची राजधानी मॉस्कोमधील शीरीमीमेटयेवो विमानतळावर एका प्रवासी विमानाल....
अधिक वाचा