ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणेकरांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन, 13 दिवसात तब्बल 8,097 नागरिकांवर कारवाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 18, 2020 09:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणेकरांकडून वारंवार नियमांचं उल्लंघन, 13 दिवसात तब्बल 8,097 नागरिकांवर कारवाई

शहर : पुणे

पुण्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे.कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत काही पुणेकरांना परिस्थितीतीच काहीच गांभीर्य नसल्याचं पुन्हा एकदा दिसून येत आहे.

पुण्यात गेल्या 13 दिवसांमध्ये तब्बल 8 हजार 97 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात 4 जुलै ते 17 जुलै दरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पालकमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनंतर 4 तारखेपासून कारवाईला सुरुवात झाली. या कारवाईसाठी शहरात ठिकठिकाणी दीडशेपेक्षा जास्त ठिकाणी नाकाबंदी सुरु आहे.

या कारवाईत विना मास्क फिरणाऱ्या तब्बल 2,135 मोकाटांवर पोलिसांनी कारवाई केली. तर, मोकाटपणे पायी फिरणाऱ्या आणि वाहनांवर फिरणाऱ्या तब्बल 3 हजार 689 नागरिकांवर कारवाई केली. या कारवाईत 1,183 वाहनं जप्त करण्यात आली. तर ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 946 नागरिकांवर कारवाई झाली.

सम आणि विषम या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 18 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ दुकानं सुरु ठेवणाऱ्या 67 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. दुकानात सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या आठ दुकानांवर कारवाई करण्यात आली. तर वेगवेगळ्या कारणानिमित्त 51 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.

लॉकडाऊनच्या काळात 1 हजार 613 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. 13 जुलै ते 17 तारखेच्या पाच वाजेपर्यंत चार दिवसातील ही कारवाई आहे.

कलम 188 अंतर्गत 794 कारवाया करण्यात आल्या आहेत. मोकाट फिरणाऱ्या नागरिकांची 397 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. तर 320 नागरिकांना 144 अंतर्गत नोटीस बजावण्यात आली आहे. त्याचबरोबर 102 मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

मागे

फोर्ट इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख; जखमींना ५० हजारांची मदत
फोर्ट इमारत दुर्घटना : मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ४ लाख; जखमींना ५० हजारांची मदत

शहरातील फोर्ट भागातील भानुशाली इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ....

अधिक वाचा

पुढे  

एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित
एसटीचा मोठा निर्णय, जवळपास दहा हजार कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित

कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊनमुळे विस्कटलेली आर्थिक घडी अशा परिस्थितीत कोणाल....

Read more