By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 24, 2020 08:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुण्यातील शिवाजीनगरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या भव्य कोव्हिड सेंटरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या 27 दिवसांपासून कोव्हिड सेंटरमधून 33 वर्षीय युवती बेपत्ता आहे. त्यामुळे मुलीची आई उपोषणाला बसली आहे.
गेल्या 27 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा तिच्या आईशी संवाद झालेला नाही. त्यामुळे तिची आई अस्वस्थ आहे. रूग्णालय प्रशासन मात्र हात झटकून रिकामं झालं आहे. प्रशासनाकडून योग्य माहिती दिली जात नाही, असा आरोप करत मुलीचा शोध लागेपर्यंत आईने उपोषण करण्याचा निर्धार केला आहे.
“आमची मुलगी 29 ऑगस्ट रोजी दवाखान्यात कोरोना उपचारासाठी भरती झाली होती. 30 तारखेला आम्ही काळजीपोटी रूग्णालयात आलो तर 49 नंबर बेडवर उपचार सुरू असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. तसंच ती बरी झाल्यानंतर आणि तिचा क्वारन्टाईन पिरीयड संपल्यानंतर आम्ही तुम्हाला कळवू असं सांगितलं गेलं. 13सप्टेंबरला आम्ही रूग्णालयात गेलो असतो तिला उद्या डिस्चार्ज देणार आहोत, असं आम्हाला सांगण्यात आलं. मात्र ती आणखीही आमच्या नजरेस पडलेली नाही”, अशा संतप्त भावना मुलीच्या आईने व्यक्त केल्या.
“आमची मुलगी नेमकी आहे कुठे?”, असा आर्त सवाल मुलीचे कुटुंबीय प्रशासनाला वारंवार विचारत आहेत. प्रशासन काही उत्तर देत नसून मुख्यमंत्री साहेब माझी मुलगी आम्हाला मिळवून द्या, अशी मागणी मुलीच्या आईने केलीये.
सुरवातीला काहीही न बोलणाऱ्या पुणे महापालिका प्रशासनाने मुलीच्या घरच्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्यावर चौकशी केली जाईल, असं नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिलंय. याबाबत बोलताना पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल म्हणाल्या, “आधी इकडची सर्व्हिस लाईफलाईन संस्थेकडे होती. त्यांच्याकडून माहिती मागवली आहे. तसंच त्यांना संबंधित रिपोर्ट सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल”.
पुण्याच्या याच कोव्हिड सेंटरमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू-
पत्रकार पांडुरंग रायकर यांना याच कोव्हिड सेंटरमधून कार्डियाक अॅम्बुलन्स न मिळाल्याने काही दिवसांपूर्वी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यानंतर रूग्णालय प्रशासनाचे पोकळ दावे उघडे पडले. तसंच रूग्णालय प्रशासनाच्या मर्यादा देखील उघड्या पडल्या.
जम्बो कोव्हिड सेंटरमधला भोंगळ कारभार चव्हाट्यावर
पुण्यात जम्बो कोव्हिड सेंटर सुरू झाल्यापासून येथील आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभारामुळे रूग्णांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे रूग्णांच्या आणि त्यांच्या नातेवाईकांच्या वाढत्या तक्रारींमध्ये भर पडतीये. शासन-प्रशासन येथील परिस्थिती कशा प्रकारे सुधारलीये हे सांगण्यात मश्गूल आहे मात्र सामान्य नागरिकांच्या आणि रूग्णांच्या नशिबी निराशाच आहे.
राज्य सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीद्वारे उपचार करण्यास....
अधिक वाचा