ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 23, 2020 10:54 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता, बुधवारपासून शोध सुरू

शहर : पुणे

पुण्यातून मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यातील आटोमोबाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक तसेच बांधकाम व्यावसायिक गौतम पाषाणकर हे बेपत्ता आहेत. 64 वर्षीय गौतम पाषाणकर हे बुधवारी सायंकाळी मॉडेल कॉलनी इथून बेपत्ता झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली असून पोलीस तपास सुरू आहे.

गौतम पाषाणकर हे पाषाणकर आटोमोबाईल्सचे व्यवस्थापकीय संचालक तसेच बांधकाम व्यावसायिक आहेत. ते कोणत्या नातेवाइकांकडे गेले आहेत का? त्यांनी कोणाशी संपर्क केला होता, याचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. पाषाणकर हे कृषी महाविद्यालयाजवळच्या मोदी बागेमध्ये राहतात.

मिळालेल्या माहितीनुसार, पाषाणकर हे बुधवारी संध्याकाळी लोणी काळभोर इथल्या त्यांच्या गॅस एजन्सीच्या ठिकाणी गेले होते. त्यानंतर त्यांनी त्यांचं कार्यालय गाठलं. यानंतर काही वेळाने पाषाणकर यांनी कार चालकाला पानशेतला एका कामानिमित्त पाठवलं होतं आणि ते गणेशखिंड रस्त्यावरील एलआयसी कार्यालयापर्यंत गेले. पण त्यानंतर ते बेपत्ता झाले अशी माहिती देण्यात आली आहेत.

पाषाणकर यांच्या कार चालकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याने पाषाणकर यांना फोन केला असता त्यांनी उत्तर दिलं नाही. त्यामुळे चालकाने याची माहिती त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर याला दिली. यानंतर कुटुंबाने शोध सुरू केला असता कुठेही पत्ता न लागल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

पोलीस सध्या जागोजागी पाषाणकर यांचा शोध घेत असून त्यांच्या नातेवाईकांची आणि कार चालकाची चौकशी करत असल्याची माहिती देण्यात आली आहे तर ते कोणालाही दिल्यास त्यांच्या कुटुंबाला या मोबाईल क्रमांकावर 9822474747 तर शिवाजीनगर पोलिस ठाणे 020-25536263 या क्रमांकावर कळवावं असं सांगण्यात आलं आहे.

 

मागे

मुंबईतील नागपाड्यातील मॉलमधील आग धुमसतीच, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी
मुंबईतील नागपाड्यातील मॉलमधील आग धुमसतीच, अग्निशमन दलाचे दोन जवान जखमी

मुंबईच्या नागपाडा भागातील सिटी सेंटर मॉलला काल (22 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमार....

अधिक वाचा

पुढे  

भारत बायटेकची लस तिसऱ्या टप्प्यात, लवकरच चाचणीला सुरुवात होणार
भारत बायटेकची लस तिसऱ्या टप्प्यात, लवकरच चाचणीला सुरुवात होणार

कोरोनाला थोपवण्यासाठी हैदराबाद स्थित भारत बायोटेक (Bharat biotech) कंपनीकडून कोव्ह....

Read more