By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 02, 2019 05:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
काल पासून भाविक गणेशमूर्ती आपआपल्या घरोघरी, सार्वजनिक मंडळाच्या ठिकाणी नेताना दिसत आहेत. अत्यंत उत्साहात व भक्तिभावाने गणपतीचे आगमन होताने दिसत आहे. गणेशोत्सव म्हटल तर त्यात पुण्याचे गणपतींचे लक्ष वेधून घेतात. गणेशोत्सवात पुण्याचे स्थान आगळे वेगळे आहे. येथे पाच मानाचे गणपती आहेत. त्या प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे. कसबा गणपती , तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालिम मंडळाचा गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती हे पाच मानाचे गणपती आहेत.
यातील गुरुजी तालिम मंडळाच्या गणपतीच्या आगमन मिरवणुकीत येरवडा खुल्या कारागृहातील 30 कैदी ढोल वादन करताना दिसत होते. या मानाच्या पाच गणपतीचे पालखीतून मिरवणुकीने मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने आगमन झाले. तर गुरुजी तालिम मंडळाच्या गणेशाच्या आगमन मिरवणुकीत कैद्द्यांचे ढोल वादन अनेक भाविकांचे लक्ष वेधून घेत होते. त्यामुळे ही मिरवणूक विशेष वैशिष्टपूर्ण ठरली.
शतकानुशतके ऐकिव कथांच्या आधारे काही गोष्टी आजही गृहीत धरल्या जात आहेत. त्य....
अधिक वाचा