By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 15, 2019 06:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
जगातल्या तिसऱ्या क्रमांकाचं शिखर कांचनजुंगा शिखर सर करण्याचा मान पुण्याच्या 'गिरिप्रेमी' या संस्थेनं मिळवलाय. या संस्थेच्या मोहिमेत सहभागी झालेल्या सर्व अर्थात १० गिर्यारोहकांनी आज सकाळी ५.३० वाजल्याच्या सुमारास कांचनजुंगाच्या शिखरावर पाऊल ठेवलंय. नेपाळ - भारत सीमेवर सिक्कीम जवळ कांचनजुंगा शिखर उभं आहे. कांचनजुंगा शिखराची उंची ८५८६ मीटर अर्थात २८,१६९ फूट आहे. कांचनजुंगा हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे शिखर आहे.
गिरिप्रेमीच्या आशिष माने, रुपेश खोपडे, भूषण हर्षे, आनंद माळी, प्रसाद जोशी, कृष्णा ढोकले, डॉ. सुमित मांदळे, विवेक शिवदे, किरण साळस्तेकर आणि जितेंद्र गवारे यांनी आज सकाळी ही यशस्वी शिखर चढाई केली. पुण्याची ही टीम मार्च अखेरीस काठमांडूकडे रवाना झाली होती. सुरुवातीचं ट्रेकिंग पूर्ण केल्यानंतर ११ मे रोजी बेस कॅम्पवरून कांचनजंगाची चढाई सुरू केली. १४ मे रोजी सायंकाळी ५ वाजता कॅम्प ४ सोडला आणि आज (बुधवारी) पहाटे साडे पाचच्या दरम्यान सगळ्यांनी शिखर सर केलं.
१९७७ च्या यशस्वी ठरलेल्या लष्करी मोहिमेनंतरची ही देशातील ही पहिलीच यशस्वी नागरी मोहीम असल्याचं मानण्यात येत आहे. तसंच एवढ्या मोठ्या गिर्यारोहकांच्या संख्येने कांचनजुंगा शिखर सर करण्याची जगातील ही पहिलीच मोहीम ठरली आहे. अवघड मार्ग आणि त्यापेक्षा अत्यंत बेभरवशाचे आणि सतत बदलणारे वातावरण यामुळे हे शिखर सर करणे अवघड मानले जाते.
मुंबईची रहिवासी असलेल्या २३ वर्षीय आरोही पंडित या तरुणीनं एक नवा इतिहास रच....
अधिक वाचा