ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात महिनाभरात तब्बल 32 हजार परप्रांतिय मजूर, नागरिक दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 03, 2020 11:29 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात महिनाभरात तब्बल 32 हजार परप्रांतिय मजूर, नागरिक दाखल

शहर : पुणे

लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर पुण्यात येणाऱ्या परप्रांतिय नागरिक, मजुरांचा ओघ कायम आहे. एका महिन्यात पुण्यात तब्बल 32 हजार 273 नागरिक, मजूर दाखल झाले आहेत. 1 जून ते 30 जून या कालावधीत हे कामगार पुण्यात पोहोचले आहेत. बिहार, कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि दिल्लीतून मजूर येत आहेत. तब्बल सहा राज्यातून हे परप्रांतिय मजूर येत असून सर्वाधिक जास्त मजूर बिहार राज्यातील आहेत

पुण्यात कुठल्या राज्यातून किती मजूर आले?

बिहार – 28 हजार 965 मजूर

कर्नाटक – 1,285 मजूर

गोवा – 397 मजूर

आंध्रप्रदेश – 311 मजूर

ओदिशा – 564 मजूर

दिल्ली – 751 मजूर

दिवसेंदिवस येणाऱ्या परप्रांतिय नागरिकांनी मजुरांची संख्या वाढतच आहे. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे येणाऱ्या नागरिक मजुरांचा वेग कमी आहे.

मेट्रोच्या कामावर 1 हजार 80 मजूर

पुणे मेट्रोवर (Pune Metro) कामासाठी 800 मजूर पोहोचले आहेत. मेट्रोवर नव्याने 200 कामगार दाखल झाले. त्यामुळे पुणे मेट्रोच्या कामगारांची संख्या 1 हजार 80 वर पोहचली आहे. अजूनही संख्या वाढत जाणार आहे.

मुंबईतून पुणेमार्गे गदग एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस, उद्यान एक्सप्रेस, हुसैन सागर एक्सप्रेस आणि गोवा एक्सप्रेस धावतात. तर, पुण्यातून बिहारसाठी फक्त दानापूर एक्सप्रेस ही एकमेव गाडी सुटते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे रेल्वे स्थानकावर परप्रांतिय प्रवाशांची वैद्यकीय तपासणी केली जाते. यासाठी रेल्वे स्थानकावर वैद्यकीय पथक आणि महसूल पथक 24 तास तैनात आहे. प्रवाशांना कोरोना संदर्भात लक्षण आढळल्यास संस्थात्मक विलगीकरण केलं जातं. तर उर्वरित प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारला जातो. त्यानंतर 14 दिवस होम क्वारंटाईनच्या सूचना केल्या जातात

 

 

मागे

उत्तर प्रदेशात पोलीस आणि गुंडांमध्ये तुफान धुमश्चक्री, आठ पोलिसांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात पोलीस आणि गुंडांमध्ये तुफान धुमश्चक्री, आठ पोलिसांचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील कानपूर येथे गुन्हेगारांशी झालेल्या धुमश्चक्रीत आठ पोलिस....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, समुद्रात उंच लाटा
मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, समुद्रात उंच लाटा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (3 जुलै) मुंबईत मुसळधार पावसाला सुर....

Read more