ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रिपोर्टपूर्वीच पुण्यात एक हजार कोरोनाबळी, महापौरांचा दावा, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 31, 2020 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रिपोर्टपूर्वीच पुण्यात एक हजार कोरोनाबळी, महापौरांचा दावा, मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

शहर : पुणे

कोरोनाचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झालेल्यांची संख्या एक हजार आहे. हे एक हजार रुग्ण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच किंवा दाखल झाल्यानंतर लगेच काही तासात मृत्युमुखी पडले आहेत.”, असा दावा पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. तसेच मृत झालेल्यांचे आकडे दर्शवले जात नाहीत. याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही महापौरांनी काल (30 जुलै) झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत केली.

प्रशासनाने हे मृत्यू लपवल्याचा आरोप नाही, मात्र याबाबत चौकशी करावी आणि अशाप्रकारे मृत्यू होण्यासाठी कार्यवाही करण्याची गरज आहे, असं मोहोळ यांनी सांगितले.

ससून रुग्णालयात दररोज बारा आणि खासगी रुग्णालयात 50 रुग्णांचा मृत्यू होत आहे. दर महिन्याला चारशे पाचशे मृत्यू होतात, रुग्णाच्या क्ष किरण अहवालात रुग्णाला कोरोना संसर्ग झाल्याचे दिसून येते. यासंदर्भात ससून रुग्णालयाने, केंद्रीय समितीने पुष्टी दिल्याचा दावाही महापौर यांनी केला आहे.”

रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल मृत्यूनंतर येत असल्याने कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रशासनाकडून दाखवलं जात नाही, असंही मोहोळ यांनी या बैठकीत सांगितले.दरम्यान, काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. मुख्यमंत्र्यांनी सुरुवातील लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. त्यानंतर अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवारही होते.

मागे

Yes Bank ची अनिल अंबानींवर मोठी कारवाई, कर्ज न फेडल्याने अंबानी ग्रुपचं मुंबई मुख्यालय ताब्यात
Yes Bank ची अनिल अंबानींवर मोठी कारवाई, कर्ज न फेडल्याने अंबानी ग्रुपचं मुंबई मुख्यालय ताब्यात

येस बँकेने कर्ज थकवणाऱ्या अनिल धीरुभाई अंबानी ग्रुपचं (ADAG) मुंबईतील मुख्याल....

अधिक वाचा

पुढे  

वीज गेल्याने व्हेंटिलेटर बंद, कोरोना कक्षात रुग्णाचा तडफडून मृत्यू
वीज गेल्याने व्हेंटिलेटर बंद, कोरोना कक्षात रुग्णाचा तडफडून मृत्यू

कोरोना कक्षात अचानक विद्युत पुरवठा बंद झाल्यामुळे रुग्णांची मोठी तारांबळ ....

Read more