ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुणे महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर, 'ही' आहे पूर्ण यादी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2020 05:48 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुणे महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर, 'ही' आहे पूर्ण यादी

शहर : पुणे

पुण्यात कोरोनाचे रुग्ण उपनगरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागाचा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित क्षेत्र वाढविण्यात आले आहेत. आता एकूण 74 प्रतिबंधित क्षेत्र असतील, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.

धनकवडी-सहकारनगर, नगररस्ता-वडगाव शेरी, कोथरुड-बावधन, हडपसर-मुंढवा, वारजे-कर्वेनगर, कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे महापालिकेने 17 ऑगस्ट रोजी घोषित करण्यात आलेल्या 66 प्रतिबंधित क्षेत्रांमधून एक क्षेत्र कमी करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट रोजी असलेल्या 75 प्रतिबंधित क्षेत्रामधून 12 क्षेत्र कमी करण्यात आले होते. पुणे महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेऊन त्याची पुनर्रचना केली जात आहे.

15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या 66 प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेतल्यानंतर ज्या भागातील रुग्ण कमी झाले आहेत त्या भागातील प्रतिबंध हटविण्यात आले आहेत.तर, काही भाग नव्याने समाविष्ठ करण्यात आले आहेत. कसबा-विश्रामबाग – 4, भवानी पेठ – 2, ढोले पाटील – 2, धनकवडी-सहकारनगर – 8, बिबवेवाडी – 5, येरवडा-कळस-धानोरी – 2, वानवडी-रामटेकडी – 2, शिवाजीनगर-घोले रस्ता – 3, नगररोड-वडगाव शेरी – 7, सिंहगड रोड – 2, हडपसर-मुंढवा – 11, कोंढवा-येवलेवाडी – 3, वारजे-कर्वेनगर – 4, कोथरूड-बावधन – 9, औंध-बाणेर -9 या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवे प्रतिबंधित क्षेत्र कमी झालेले आहेत.

पुढे  

हॉटेलमध्ये रुम हवी तर 'हा' वैदयकीय अहवाल द्या, हॉटेल चालकांचा निर्णय
हॉटेलमध्ये रुम हवी तर 'हा' वैदयकीय अहवाल द्या, हॉटेल चालकांचा निर्णय

सध्या महाराष्ट्र आणि त्याच्या जिल्ह्ययात कोरोना वाढतो आहे. आता अनेक शहराती....

Read more