By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
शनिवार पेठेतील प्रभात टॉकीज समोरील इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सकाळी आग लागल्याची घटना घडली. या आगीत येथील तळमजल्यावरील मेडिकलचे दुकान खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज अग्निशामक विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तर आगीच्या घटनेची माहिती मिळताच महापौर मुक्ता टिळक यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अग्निशामक विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार पेठ प्रभात टॉकीज समोरील जोशी संकुलच्या पहिल्या मजल्यावर सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास मेडिकलच्या दुकानात आग लागली. या आगीच्या धुरामुळे इमारतीमधील नागरिकांना खाली येणे अशक्य झाल्याने जवळपास 25 जण टेरेसवर अडकले होते. अग्निशामक विभागाच्या सात गाड्याच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. तसेच, टेरेस वरील नागरिकांना जवानांनी बीए सेट घालून सुखरूप खाली उतरवले.
पुण्यातील आयटी पार्क शेजारी असणार्या कासारसाई इथे गेल्या काही दिवसांपास....
अधिक वाचा