By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 05, 2020 11:50 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झाल्यानंतर प्रतिबंधित आणि इतर ठिकाणी सातत्याने नियमांचे उल्लंघन होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, पोलिसांनी शुक्रवारी (4 जुलै) ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन कारवाई केली. शहरात वेगवेगळ्या तब्बल 1 हजार 16 कारवाया केल्या. तसेच, विना मास्क फिरणाऱ्या 102 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
संचारबंदीचा कालावधी रात्री 11 ते पहाटे पाच वाजेपर्यंत आहे. या कालावधीत नियमांच उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईसाठी पुणे शहरात 94 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. या कारवाईसाठी 85 अधिकारी आणि 337 कर्मचारी तैनात करण्यात आले.
विनापरवानगी संचार करणाऱ्या 69 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. तर विना मास्क मोकाट फिरणाऱ्या 102 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. रात्री ते पहाटे संचार बंदीच्या काळात 97 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे.तर, 188 अंतर्गत 184 नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. 108 वाहनं जप्त करण्यात आली आहेत. ट्रिपल सीट वाहन चालवणाऱ्या 131 जणांवर कारवाई केली. सिग्नल जम्पिंग 110, रॉन्गसाईड 57, फुटपाथवर गाड्या चालवणे 31 जणांवर कारवाई केली. तर बेदरकार गाडी चालवणाऱ्या 57 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यात काल (4 जुलै) रेकॉर्ड ब्रेक 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल....
अधिक वाचा