By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 11, 2024 09:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
लांब पल्याच्या प्रवासाचे तिकीट तीन महिन्यांपूर्वी तिकीट विंडो सुरु होताच संपतात. तसेच तत्काळ तिकीट एका मिनिटांत संपतात. यामध्ये दलालांची भूमिका महत्वाची असते.आता रेल्वेने दलांना रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे.
रेल्वेचे आरक्षित तिकीट मिळवणे एक दिव्यच असते. लांब पल्याच्या प्रवासाचे तिकीट तीन महिन्यांपूर्वी तिकीट विंडो सुरु होताच संपतात. तसेच तत्काळ तिकीट एका मिनिटांत संपतात. यामध्ये दलालांची भूमिका महत्वाची असते. भारतीय रेल्वेने दलालांना रोखण्यासाठी अनेक उपाय केल्यानंतर यश आले नाही. आता रेल्वेने दलांना रोखण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. देशात प्रथमच आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय (artificial intelligence) दलालांना रोखण्यात येणार आहे. त्याची सुरुवात पुणे आरक्षण केंद्रावरुन सुरु झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांना आरक्षण मिळणे सोपे होणार आहे.
काय आहे तंत्रज्ञान
पुणे रेल्वे स्थानकावर जिओ कंपनीकडून एआय असलेले चार कॅमेरे बसवण्यात आले आहे. आरक्षित तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेने हे पाऊल उचलले आहे. यासाठी यंत्रणेत १०० दलालांचे फोटो अपलोड केले आहे. आरक्षण केंद्रातील खिडक्यांवर आणि परिसरात बसवलेल्या एआय कॅमेऱ्याद्वारे तिकीट काढण्यासाठी आलेल्या रांगेतील व्यक्तींवर नजर ठेवली जाईल. त्या व्यक्तीचे चित्रिकरण करुन रेकॉर्डिंग होणार आहे. दलाल किंवा अन्य संशयित व्यक्ती आरक्षण केंद्रावर आल्यास त्याचा अलर्ट आरक्षण केंद्र प्रमुखाला जाईल. यामुळे दलालच नाही तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती या परिसरात फिरु शकणार नाही.
काय असणार फायदे
तिकीट रांगेत संशयास्पद व्यक्ती आल्यानंतर अलार्म वाजणार आहे. तसेच वारंवार येणाऱ्या व्यक्ती देखील लक्षात येणार आहेत. आरक्षण केंद्रावर प्रवाशांची रांग वाढली तर अलार्म वाजणार आहे. त्यानंतर गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेकडून प्रयत्न केले जाणार आहे. तत्काळ तिकिटांसाठी याचा मोठा फायदा होणार आहे. देशात प्रथमच हा प्रयोग पुणे शहरात होत आहे.
रेल्वे स्थानकावर सध्या ६१ सीसीटीव्ही
पुणे रेल्वे स्थानकावर सध्या ६१ सीसीटीव्ही कॅमेरे असून आणखी ६५ कॅमेरे मार्च २०२४ पर्यंत लावले जातील. तसेच एआय असणारे कॅमेरे लावले गेले आहेत. त्याचा फायदा गुन्हेगारी रोखण्यासाठी होणार आहे. तसेच बेकायदेशीर तिकीट विक्री करणारे लगेच नजरेत येणार आहेत.
राज्यातील उच्च शिक्षणात मुलींचा सहभाग वाढावा यासाठी शिंदे सरकारने महत्त्....
अधिक वाचा