ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जल्लोष केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2019 03:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर जल्लोष केल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर  गुन्हा दाखल

शहर : jammu

जम्मू कश्मीरमधून अनुच्छेद 370 काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात जल्लोष सुरु आहे. पंजाबच्या पटियालामध्ये मात्र जल्लोष करत असताना शिवसेनेच्या 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबमधील लोकांना आवाहन केलं आहे की, नाजूक परिस्थितीमुळे या मुद्द्यावर जल्लोष करु नका आणि या निर्णयाला विरोध ही करु नका. पण पटियालाच्या पातडामध्ये शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोश केला आणि लाडू देखील वाटले. यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर पंजाब पोलिसांनी वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असल्याचं कळतं आहे. शिवसेना कार्यकर्त्यांना कोर्टात सादर केलं जाणार आहे.

सोमवारी भारत सरकारने अनुच्छेद 370 संपवत असल्य़ाची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारा हा कायदा मोदी सरकारने काढून घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरातून अनेकांनी याचं स्वागत केलं आहे. जम्मू-काश्मीर आता राज्य नसून केंद्र शासित प्रदेश बनणार आहे. सोबतच लद्दाख हे वेगळं केंद्रशासित प्रदेश असणार आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा असेल पण लद्दाखमध्ये विधानसभा नसणार आहे.

जम्मू-काश्मीरचा हा विशेष दर्जा काढून घेण्याचा संकल्प सोमवारी राज्यसभेत केल्यानंतर आज लोकसभेत यावर चर्चा होणार आहे.

पुढे  

दोन व्यक्तींना आधीच होती अमित शहांच्या 'मिशन काश्मीर'ची कल्पना
दोन व्यक्तींना आधीच होती अमित शहांच्या 'मिशन काश्मीर'ची कल्पना

सोमवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सदनामध्ये जम्मू- काश्....

Read more