By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 30, 2020 09:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अमरावती
कोरोना विषाणूचा फैलावर वाढत असल्याने संक्रमित झालेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र, या ठिकाणी वेगळीच समस्या निर्माण होताना दिसत आहे. कोविड सेंटरवर क्वारंटाईन पोलीस कर्मचाऱ्याने नशा करत धिंगाणा घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. तसेच त्यांने पळून जाण्याची धमकी दिल्याने गोंधळात अधिक भर पडली आहे. दरम्यान, क्वारंटाईन असताना या पोलीस कर्मचाऱ्याला नशा करायला कशी मिळाली, असा प्रश्न उपस्थित होत सुरक्षेचा प्रश्नाची ऐशी-तैशी दिसून येत आहे.
चांदूर रेल्वे शहरातील शासकीय वसतीगृहात असलेल्या कोविड सेंटरवर क्वारंटाईन असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने रात्री गोंधळ घालून जबरदस्तीने हा कर्मचारी घरी गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या कर्मचाऱ्याने मद्य प्राशन केल्याचे सांगण्यात येत आहे. चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी शनिवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे चाचणी अहवाला स्पष्ट झाले. त्यानंतर २६ जुलै रोजी पोलीस स्टेशनमधील ४ कर्मचारी, २ होमगार्ड आणि एक अन्य सामान्य व्यक्ती अशा ७ जणांना स्थानिक कोविड सेंटरवर क्वारंटाईन करण्यात आले होते.
यांचा थ्रोट स्वॅब घेतला असून अहवाल येणे बाकी आहे. अहवाल येईपर्यंत त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. परंतु चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचा एक ३५ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याने रात्री मद्य प्राशन करुन क्वारंचाईन सेंटरवर गोंधळ घातला. तो एवढ्यावर थांबला नाही, त्याने धमकी दिली. "मला घरी जाऊ दिले नाही तर मी पळून जाईल" असे क्वारंटाईन सेंटरवर असलेल्या कर्मचाऱ्यांना सांगितले. यानंतर कर्मचाऱ्याकडून लेखी लिहून घेतले आणि घरी जाण्यास सोडले. आरोग्य खात्याने या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष का केले, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
क्वारंटाईन असतांना कोविड सेंटरवर मद्य कुठून आले याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची पोलीस ठाणेदारांनी बुधवारी कोविड सेंटरला भेट देऊन याबाबतची माहिती घेतली. घडलेली घटना ही पोलीस खात्याला न शोभणारी आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्याचा अहवाल ग्रामीण पोलीस अधिक्षकांना पाठविणार असल्याचे चांदूर रेल्वेचे ठाणेदार दीपक वानखडे यांनी सांगितले.
अखेर बहुप्रतिक्षित दहावीच्या परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे. मार्च 2020 मध्....
अधिक वाचा