By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 04:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : shirdi
भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष असलेल्या अहमदनगरमधील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात आग लागली. प्रवरा गावाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या साखर कारखान्याच्या वीज प्रकल्पाला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये पाच कामगार गंभीर जखमी झाले आहेत. आगीने क्षणात रौद्र रुप धारण केल्यामुळे विखे पाटील साखर कारखाना परिसरात आगीचे लोळ दिसू लागले. त्यानंतर कारखान्याच्या अग्निशामक दलासह राहाता, शिर्डी, राहुरी तसेच संगमनेर येथील अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. एक तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कारखान्यात काम करणारे पाच कामगार आगीत गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
कारखान्याचे अध्यक्ष आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही घटनास्थळी दाखल होत मदतकार्य करण्यासाठी सूचना दिल्या. विखे यांची फेब्रुवारी महिन्यातच अध्यक्षपदी निवड झाली होती. अहमदनगरमधील प्रवरा येथे असलेला हा आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे.
प्रवरा सहकारी साखर कारखान्याचा इतिहास
राधाकृष्ण विखे पाटील यांचे आजोबा म्हणजे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील. विठ्ठलरावांनी 1915 पासून अहमदनगरमधल्या प्रवरा परिसरात सहकार क्षेत्रात काम करण्यासाठी सुरुवात केली होती. त्यांना केंद्र सरकारने ‘पद्मश्री’ देऊन गौरवलं आहे. (Pravara Sugar Factory Fire)
17 जून 1950 रोजी अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगर (लोणी) मध्ये आशिया खंडातील सहकारी तत्त्वावरचा पहिला साखर कारखाना डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभा राहिला.
सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेनंतर 1964 मध्ये विखे कुटुंबाने शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला. विठ्ठलराव विखे यांनी ‘प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थे’ची स्थापना केली. त्यानंतर त्यांचे पुत्र बाळासाहेब विखे अर्थात राधाकृष्ण यांचे वडील 1962 पासून सार्वजनिक जीवनात सक्रिय झाले.
कोरोना संशयिताला आणण्यासाठी १०८ क्रमाकांच्या रुग्णवाहिकेने नकार दिल्याच....
अधिक वाचा