By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 19, 2020 10:41 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
भारतीय वायूदलात नव्यानेच दाखल झालेली राफेल लढाऊ विमाने (Rafael jets) आता पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि अतिविध्वसंक शस्त्रास्त्रे ही राफेलची जमेची बाजू आहे. सध्याची परिस्थिती पाहता भारताला पश्चिमी आणि पूर्व आघाड्यांवर एकाचवेळी लढण्याची वेळ येऊ शकते. त्यावेळी राफेल विमानांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल.
राफेलची निर्मिती करणाऱ्या दसॉल्ट या फ्रेंच कंपनीने राफेलमध्ये असणाऱ्या स्कॅल्प लाँग रेंज क्रुझ क्षेपणास्त्रासाठीचे सॉफ्टवेअर दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता हे सॉफ्टवेअर अद्ययावत झाल्यानंतर राफेल विमानांची संहारक क्षमता अनेक पटींनी वाढणार आहे. राफेल विमान हजार किलोमीटर अंतरावरुनही शत्रुचे तळ उद्ध्वस्त करु शकेल. स्कॅल्प सॉफ्टवेअरशिवाय राफेल विमानांमधील हॅमर क्षेपणास्त्रांचीही नुकतीच यशस्वी चाचणी करण्यात आली.
स्कॅल्प मिसाईल होणार अपग्रेड
राफेलमध्ये असणारे स्कॅल्प लाँग रेंज क्रुझ क्षेपणास्त्र अपग्रेड झाल्यानंतर समुद्राच्या तळापासून 4000 मीटर उंचीवर असणाऱ्या लक्ष्याचाही अचूक भेद करू शकते. तसेच या क्षेपणास्त्राची रेंज 300 किलोमीटरवरून 450 किलोमीटरपर्यंत वाढवण्यात आली आहे. 2021 पर्यंत भारतीय वायदूलाला तीन नवीन राफेल जेट मिळणार आहेत. स्कॅल्प क्षेपणास्त्रांच्या अपग्रेडशनमुळे राफेलची ताकद शतपटींनी वाढणार आहे.
आगामी काळात चीनसोबत युद्ध झाल्यास राफेल विमानांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरु शकते. सध्या राफेलची एक स्क्वाड्रन अंबाला येथे आहे तर दुसरी स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हाशिमरा तळावर असेल. हाशिमरा तळ चीनच्या सीमेपासून काही अंतरावर असलेल्या सिलिगुडीनजीक आहे. एप्रिल 2021 पर्यंत भारतीय वायूदलाकडे 36 राफेल विमानांची स्क्वाड्रन सुसज्ज असेल.
हॅमर क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी
स्कॅल्प क्षेपणास्त्रासोबत राफेलमध्ये हॅमर क्षेपणास्त्र लावले जाण्याची शक्यता आहे. हॅमर क्षेपणास्त्राच्या दोन चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. हॅमर क्षेपणास्त्र 1000 किलो स्फोटके वाहून नेऊ शकते. राफेल विमानांमध्ये बीवीआर एअर टू एअर मिसाईल मिटियोरची सुविधा आहे. त्यामुळे 100 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून लक्ष्याचा अचूक भेद करता येऊ शकतो.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत मतपत्रिकांची हेराफेरी झाल्याचा गंभीर आरोप पदवी....
अधिक वाचा