By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 03, 2019 01:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
फ्रांस बनावटीचे राफेल फायटर विमान लवकरच भारताला मिळणार असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगितले जात आहे. येत्या 19 सप्टेंबरला पहिले राफेल फायटर विमान इंडियन एअर फोर्सच्या हवाली केले जाणार आहे. हवाई दलाकडून हवाईदल प्रमुख बी. एस. धानोआ या कार्यक्रमाला जाणार आहेत. तर राजनाथ सिंह ही या कार्यक्रमाला जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
भारताने फ्रांसकडून 36 राफेल विमानाची खरेदी केली आहे. सप्टेंबर 2022 पर्यंत भारताला सर्व 36 विमाने मिळतील. सप्टेंबर 2016 मध्ये राफेल विमानाची खरेदी करार केला गेला. 59 हजार कोटी रूपयांचा हा करार आहे. 19 सप्टेंबरच्या कार्यक्रमानंतर पुढच्या वर्षी एप्रिल ते मे दरम्यान राफेलची पहिली तुकडी भारताला मिळणार आहे. राफेलच्या खरेदीवरुन विरोधकांनी प्रचंड विरोध करुन भ्रष्टाचाराचे आरोप केले होते.
कसे आहे राफेल फायटर विमान?
फ्रान्सच्या दासो कंपनी निर्मित हे विमान तेथील वायू सेना आणि नौदल सेनेच्या सेवेत आहे. एकाच वेळी 40 ठिकाणांचा पत्ता लावणे आणि त्यातून चारवर एकाच वेळी वार करणे याची विशेषता आहे.
वेग 2300 किमी / प्रती तास
रेंज 3700 किमी
एकावेळी 6 मिसाईल वाहून नेण्याची क्षमता
रायगड मधील उरण येथे असलेल्या ओएनजीसी गॅस प्लांटला आज सकाळी 7 च्या सुमारास आग....
अधिक वाचा