By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 20, 2020 11:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केरळमधील दोन बहिणींना गेल्या वर्षी दिलेला शब्द पाळला आहे. त्यांनी सोमवारी के.काव्या आणि कार्थिका या दोन बहिणींना नवीन घराच्या चाव्या प्रदान केल्या. या दोन्ही बहिणींनी मागील वर्षी झालेल्या कवलपरा दुर्घटनेत कुटुंबीयांना गमावले होते. राहुल गांधी यांनी भेट घेऊन त्यांना नवीन घर देण्याचं आश्वासन दिले होते.
केरळमध्ये मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसादरम्यान डोंगराची दरड कोसळल्याने के. काव्या आणि कार्थिकाच्या संपूर्ण कुटुंबाला जीव गमवावा लागला होता. दोन्ही बहिणी होस्टेलमध्ये वास्तव्यास असल्यामुळे वाचल्या होत्या. या घटनेनंतर राहुल गांधींनी दोन्ही बहिणींची भेट घेत नवीन घराचे आश्वासन दिले होते. एका वर्षानंतर त्यांनी ते पूर्ण केले आहे.
कवलपरा दुर्घटनेत एकूण 59 व्यक्तींना जीव गमवावा लागला होता. मुसळधार पावसानंतर डोंगराचा भाग कोसळला होता. या दरम्यान राहुल गांधींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वायनाडमध्येही दरड कोसळली होती. यात 17 जणांनी जीव गमावला होता.
राहुल गांधी सध्या केरळमधील वायनाडच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. नऊ महिन्यानंतर गांधी त्यांच्या मतदारसंघात आले आहेत.मलाप्पुरम जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना आढावा बैठकीला राहुल गांधींनी उपस्थिती लावली.
राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघातील कोरोना स्थितीचा आढावा घेणार आहेत. यासोबत ते निवडक नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती वायनाड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आय.सी. बालकृष्णन यांनी दिली. ते आज वायनाड जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. राहुल गांधींचा तीन दिवसीय दौरा बुधवारी संपणार आहे.
देशातील कोरोनाची साथ आटोक्यात येऊन परिस्थिती थोडीशी सुधारल्यानंतर केंद्र....
अधिक वाचा