By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 04, 2019 05:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
"माझी विचारांची लढाई सुरुच राहणार असून गेल्या 5 वर्षात लढलो त्यापेक्षा अधिक त्वेषने यापुढेही लढणार आहे." असे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमासी बोलताना म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सामाजिक कार्यकर्ते गौरी लंकेश यांच्या हत्येशी संबंध जोडण्याप्रकरणी शिवडी कोर्टात राहुल गांधी यांच्यावर मानहाणीचा दावा दाखल करण्यात आला आहे. या प्रकार्ंनाच्या सुनावणीसाठी राहुल गांधी शिवडी कोर्टात आले होते. न्यायालयाणे 15000 रुपयांच्या जातमुलक्यावर राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला. यानिमिताने मुंबईत आलेल्या राहुल गांधी यांनी प्रसारमाध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले .
राहुल गांधी शिवडी कोर्टात दाखल होत असताना मुंबईतील कॉँग्रेसच्या कार्यकत्यंनी कोर्टाबाहेर मोठी गर्दी केली होती. राहुल गांधींचे आगमन होताच कार्यकरणी त्यांच्या समर्थक जोरदार घोषणा बाजी केली. लोकसभा निवडणीकीच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ता गौरी लंकेश यांच्या हत्येच्या संबंध भारतीय जनता पक्ष आणि आर एस एस च्या विचारधारेशी जोडल्याच्या आरोपाखाली राहुल गांधी आणि कामुनिस्ट नेते सीताराम येचुरी यांच्याविरोधात मानहाणीचा दावा दाखल करण्यात आला होता. आर एस एस कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. मानहाणीप्रकरणी चंपानेरकर यांनी दोन्ही नेत्यांकडून 1 रुपयाची मागणी केली आहे. आर एस एस ला गौरीलंकेश यांच्या हत्येशी जोडून राहुल गांधी यांनी संघटनेची बदनामी केली आहे, असे चंपानेरकर यांचे म्हणणे आहे.
उद्या 5 जुलै रोजी मोदी सरकारच्या दुसर्या सत्ता काळातील पहिलं आर्थिक बजेट ....
अधिक वाचा