By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 11, 2019 04:20 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहिलं आहे. अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला, जयराम रमेश यांनी मिळून हे पत्र लिहिलं आहे. राहुल गांधी अमेठीत पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांच्या चेहर्यावर कोणी तरी सात वेळा हिरव्या कलरची लेझर लाइट मारली. स्नायपर हल्ल्यात अशी लेझर लाइट वापरली जात असल्याची शक्यताही काँग्रेसनं व्यक्त केली आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या जीविताला धोका असून, त्यांची सुरक्षा वाढवण्याची गरज असल्याचं काँग्रेसनं म्हटलं आहे. काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या लिहिलेल्या या पत्राबरोबर पेन ड्राइव्हमध्ये तो हिरव्या लेझर लाइटचा व्हिडीओही पाठवला आहे. काँग्रेसच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचाही या पत्रात उल्लेख आहे. काँग्रेसनं हा व्हिडीओ जारी केला असून, त्यात 15 सेकंदांपर्यंत चेहर्यावर लेझर लाइट मारलेली दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी राफेल करारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर प्रतिक्रिया देत आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेची भगवी ओळख स....
अधिक वाचा