ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राहुल गांधी यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राहुल गांधी यांचा लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज दाखल

शहर : विदेश

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत बहिण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी उपस्थीत होत्या. अर्ज भरल्यानंतर राहुल आणि प्रियंका गांधी  रोडशोमध्ये सहभागी झाले आहेत. राहुल गांधी उत्तर प्रदेशातील अमेठी आणि केरळमधील वायनाड अशा दोन मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यापैकी वायनाड लोकसभा मतदार संघातून राहुल गांधी यांनी उमेदवारी उर्ज दाखल केला आहे. राहुल गांधी यांनी दक्षिण हिंदुस्थानातून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत होती. केरळ, तामिळनाडु तसेच कर्नाटकातूनही याबाबत मागणी होत होती. त्यामुळे अमेठीसोबतच वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे राहुल यांनी ठरवल्याचे काँग्रेस पक्षाकडून सांगण्यात आले होते.

मागे

‘एस्प्लनेड मेन्शन’ पूर्ण रिकामी करा - उच्च न्यायालयाचे ‘म्हाडा’ला आदेश
‘एस्प्लनेड मेन्शन’ पूर्ण रिकामी करा - उच्च न्यायालयाचे ‘म्हाडा’ला आदेश

दक्षिण मुंबईमधील काळाघोडा परिसरातील धोकादायक अवस्थेत असलेली ‘एस्प्लनेड....

अधिक वाचा

पुढे  

एप्रिलमध्ये १० दिवस बॅंका बंद
एप्रिलमध्ये १० दिवस बॅंका बंद

१ एप्रिल २०१९ पासून नवे आर्थिक वर्षे सुरू झाले आहे. प्रत्येक एप्रिलमध्ये बॅ....

Read more