By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 04, 2019 12:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रायगड
काल पासून सुरू असलेल्या पावसाने रायगड भागात जास्तच जोर धरला असल्याचे दिसत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच रस्ते वाहतुकीवर ही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यात ताम्हणी-माणगाव येथे घाटात दरड कोसळली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. तसेच सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुंडलिका,अंबा, सावित्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावातील लोकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देखील देण्यात येत आहे. तर हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.
रायगड जिल्ह्यात ताम्हणी-माणगाव येथे घाटात दरड कोसळली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे.
— Mantralaya Control Room, Maharashtra (@MantralayaRoom) September 4, 2019
तसेच सतत सुरू असलेल्या पावसामुळे पुंडलिका,अंबा, सावित्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होत असल्याने नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात येत आहे. @MahaDGIPR
सकाळी 9.16 मिनिटांनी बंद झालेल्या वसई विरार लोकल विरार वरुन वसईच्या दिशेने ....
अधिक वाचा