By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 25, 2019 06:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : रायगड
रायगड जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाला गालबोट लागले आहे. दहीहंडी फोडल्यानंतर खांब कोसळून एका गोविंदाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आज तीन गोविंदांचा मृत्यू झाला. खालापूर तालुक्यातील चौक नवीन वसाहत येथे ही दुर्घटना घडली. दहीहंडी बांधलेला खांब कोसळल्याने गोविंदा शुभम दत्तात्रय मुकादम हा जखमी होऊन मृत्यू पावला. तसेच दुसरा गोविंदा अजिंक्य विक्रम मोरे गंभीर जखमी झाला. त्याला एम जी एम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
दहीहंडी फोडताना पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हळहळ व्यक्त होत आहे. अर्जुन खोत (२५) असे मृत गोविंदाचे नाव आहे. म्हसळा तालुक्यातील खरसई गावात ही घटना घडली.
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे शनिवारी दुपारी दिल्लीच्या एम्स ....
अधिक वाचा