By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 22, 2019 01:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
रेल्वे कर्मचार्यासाठी लवकरच 7 वा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे कर्मचार्यांच्या वेतनात असलेला फरक संपुष्टात येणार आहे. परिणामी भविष्यात एकाच वर्गातील सर्व कर्मचार्यांना समान वेतन मिळेल. यापूर्वी लागू करण्यात आलेल्या 6 व्या वेतन आयोगानुसार एकाच श्रेणीच्या दोन अधिकार्याच्या वेतनात फरक होता. मात्र 7 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर कर्मचार्यांच्या वेतनात 3 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अंतर असेल तर आता त्यांचे वेतन समान पातळीवर येईल. उदाहरणार्थ, 6 व्या वेतन आयोगानुसार 2 वेगवेगळ्या श्रेणीतील कर्मचार्यांचे वेतन अनुक्रमे 7210 व 7430 रुपये असेल तर 7 वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर पहिल्या कर्मचार्यांचे वेतन 18530 आणि दुसर्याचे 19095 रुपये झाले पाहिजे. मात्र 7 व्या वेतन आयोगाच्या तक्त्यानुसार दोन्ही कर्मचार्यांना 19100 रुपये इतके समान वेतन मिळेल.
उतराखंडच्या उत्तरकाशीत टिकोची गावाकडे पुरग्रस्तांना सहकार्य करण्यासाठी ....
अधिक वाचा