By PRIYANKA BAGAL | प्रकाशित: एप्रिल 20, 2019 11:33 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रविवारी २१ एप्रिल रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उपनगरीय रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळाच्या देखभालीसाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी २१ एप्रिल रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसंच मध्य रेल्वेच्या इगतपुरी स्थानकात घेण्यात आलेल्या विशेष ट्राफिक आणि पॉवर मेगाब्लॉगमुळेही काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.
मध्य रेल्वे- मुख्य मार्गावर मांटुगा ते मुंलुड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ३.५० वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. माटुंगाहून सुटणाऱ्या लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान डाउन धीम्या मार्गावरील वाहतूक सकाळी १०.५७ ते दुपारी ३.५२ वाजेपर्यत डाउन जलद मार्गावरून चालवण्यात येणार आहे.
कोल्हापूर येथे जवानाच्या पत्नीने दोन चिमुकल्यांसह पेटवून आत्महत्या केल्य....
अधिक वाचा